कोरोना काळात..जळगाव शहरात दरमहा १०० ने वाढ

स्मशानभूमी, कब्रस्तानात अंत्यविधीसाठी नेले असता त्या ठिकाणी नोंद होऊन ती महापालिकेत पक्क्या रजिस्टरमध्ये वर्ग केली जाते.
deth
dethdeth

जळगाव : शहरात नोंद होणाऱ्या मासिक मृत्यूच्या सरासरीत कोविड काळात तब्बल शंभरने वाढ झाली आहे. २०२० पर्यंत मासिक सरासरी साडेतीनशे मृत्यू होत होती. तोच आकडा कोविड संक्रमण काळात म्हणजे २०२० या वर्षात साडेचारशेपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.
जळगाव महापालिकेत दैनंदिन मृत्यूची नोंद घेतली जाते. हॉस्पिटल अथवा घरी झालेल्या मृत्यूंची नोंद स्वतंत्रपणे राखली जाते. हॉस्पिटलमधून बनलेली पावती स्मशानभूमीत दाखविल्यानंतर तशी नोंद होते. घरीच नैसर्गिक मृत्यू झाल्यास स्मशानभूमी, कब्रस्तानात अंत्यविधीसाठी नेले असता त्या ठिकाणी नोंद होऊन ती महापालिकेत पक्क्या रजिस्टरमध्ये वर्ग केली जाते.

deth
विद्यार्थी घडविणारा शिक्षक..मनरेगाचा मजदूर; पंपावर पेट्रोल विकण्याची वेळ

२०२० मध्ये वाढली सरासरी
कोविडच्या संक्रमण काळात जळगाव शहरात नेमके किती मृत्यू झाले, यासंबंधीच्या नोंदणी झालेल्या आकडेवारीबाबत माहिती घेतली असता गेल्या चार वर्षांत २०२० मध्ये म्हणजे कोविडच्या संक्रमण वर्षात मृत्यूची आकडेवारी वाढल्याचे दिसून येते. एरवी २०१७ पासून शहरात मृत्यूची नोंद झालेला आकडा सरासरी चार हजारांवर असताना हाच आकडा २०२० मध्ये तब्बल साडेपाच हजारांवर पोचल्याचे दिसून आले.

deth
dethdeth

मे २०२० पासून वाढ
२०२० मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत मासिक सरासरी मृत्यूंची नोंदणीकृत संख्या साडेतीनशे ते चारशेच्या दरम्यान राहिली. मे महिन्यापासून हीच संख्या साडेपाचशे, सातशे व थेट आठशेपर्यंत पोचून ऑक्टोबरनंतर पुन्हा थोडी कमी झाल्याचे समोर आले आहे.


सर्वांत कमी अन्‌ सर्वाधिक
कोविडचा संक्रमण काळ गेल्या वर्षी २०२० मध्ये मार्चपासून सुरू झाला. जळगाव शहरात २८ मार्चला पहिला रुग्ण सापडला. नंतर एप्रिलच्या १७ तारखेपासून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले. गेल्या वर्षी पहिल्या लाटेच्या तीव्रतेचा काळ मे ते सप्टेंबर होता. त्याआधी या वर्षात एप्रिल महिन्यात सर्वांत कमी म्हणजे अवघे ९६ मृत्यू शहरात नोंदले गेले, तर गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक म्हणजे तब्बल ८३४ मृत्यूंची नोंद जुलै महिन्यात झाली.

deth
मामा- भाची सोबत जात असताना अपघात; मामाचा जागीच मृत्‍यू

या वर्षाची मृत्यू नोंद
जानेवारी : ६७८
फेब्रुवारी : ४३८
मार्च : ६३६

deth
शेळ्या हुसकावण्यासाठी गेला शेतात अन्‌ त्‍याच्या नजरेस पडले

वर्ष----२०१७---२०१८--२०१९--२०२०
महिना
जानेवारी----३२४----२८८---४२०---४९८
फेब्रुवारी----२६४----४१०---४६८----३१८
मार्च----२८८----३१६---३३४----१२६
एप्रिल---३४२----३४८---३७८----९६
मे------३८४----३४०---२८८----७९२
जून----३४८-----२८७---४०८---४५६
जुलै----३५४-----२८८---३७२---८३४
ऑगस्ट--३२४----३६६---३७८---४०२
सप्टेंबर----४५०----३८३----४०२---७२६
ऑक्टोबर--३८४----४२०----३४२---४५०
नोव्हेंबर----३४८----३५९----३५३---७०२
डिसेंबर----५१६----२९३----२४६---२९४
-------------------------------------
एकूण---४,३२६--४,०९८---४,३७९---५,६९४

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com