esakal | जळगाव जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात सज्जता

बोलून बातमी शोधा

 health centers
जळगाव जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात सज्जता
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः शहरासह जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. तीन दिवसांपूर्वी दोन हजार ७०० रुग्णांना ऑक्सिजन लागत होता. काही आयसीयूत दाखल होते. त्यातही ५०० रुग्णांची घट झाली आहे. आगामी काही महिन्यात तिसरी कोरोना लाटेची (corona third wave) शक्यता विचारात घेता मोहाडी महिला रुग्णालयात अत्याधुनिक सामग्रीची सज्जता करण्यात येत आहे. जळगावला आणखी एक ऑक्सिजन प्लांट (oxygen plant) व जिल्ह्यात दहा, असे एकूण ११ ऑक्सिजन प्लांट आगामी दीड-दोन महिन्यात कार्यान्वित होतील, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण (District Surgeon Dr. N. S. Chavan) यांनी दिली. ( corona third wave readiness all health centers jalgaon district)

हेही वाचा: राज्यातील विद्यापीठ कॅम्पसमध्ये ‘तंबाखू, छेडछाडमुक्त’ अभियान

रुग्णसंख्येत होत असलेली घट व आगामी नियोजनाबाबत ते सांगत होते. ते म्हणाले, हवेतून ऑक्सिजन शोषून त्यापासून ऑक्सिजन तयार करण्याचे तब्बल अकरा ठिकाणी नियोजन आहे. त्यातील भुसावळला पहिला ऑक्सिजन प्लांट (oxygen plant) तयार झाला.

मोहाडी रुग्णालयात सर्वांत मोठा ऑक्सिजन प्लांट तयार होत आहे. इतर ठिकाणी कमी-अधिक क्षमतेप्रमाणे ऑक्सिजन प्लांट तयार करून तेथील तयार ऑक्सिजनचा तेथेच वापर केला जाणार आहे.

हेही वाचा: ‘अमृत’, ‘मलनिस्सारण’ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा !

दोन ठिकाणी रिफिलिंग प्लांट

मोहाडी रुग्णालयात व मुक्ताईनगरला ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट तयार करण्यात येत आहे. त्या ठिकाणच्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवून ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरवून गरज असलेल्या शासकीय रुग्णालयात पाठविण्याची सोय करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासणारच नाही, असे नियेाजन केले जात आहे.