corona
corona

जिल्ह्यात दिवसभरात 48 नवे बाधित 

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागातही "कोरोना'चा शिरकाव झाल्याने तेथील जनजीवन विस्कळित होऊ लागले आहेत. कोविड रुग्णालयाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज दिवसभरात "कोरोना'चे 48 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील "कोरोना'बाधितांची संख्या आता 571 वर पोहोचली आहे. 
जळगावसह अमळनेर आणि भुसावळ शहरांनी शंभरी कधीच पार केली आहे. चिंतेची बाब म्हणजे, जिल्ह्यातील एकही तालुका आता "कोरोना'बाधितांपासून सुटलेला नाही. आज जळगाव, भडगाव, नशिराबाद, चोपडा, सावदा, भुसावळ, जामनेर, पहूर, रावेर, पाचोरा येथील 277 जणांचे अहवाल प्राप्त झाले. 

बाधितांची संख्या वाढतीच 
जळगाव जिल्ह्यात आज आणखी 48 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. दिवसभरात जिल्ह्यातील 277 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून 229 अहवाल निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भडगावचे चार, पहूर दोन, पाचोरा तीन, निंभोरासिम (ता. रावेर) तीन, भोकर तीन, रावेर 2, भुसावळ 2, चोपडा, सावदा, जामनेर, उमाळा (ता. जळगाव), विटनेर (ता. जळगाव) येथील प्रत्येकी एक तर जळगाव शहरातील जाखनीनगर, तांबापुरा, सालारनगर, जाखनीनगर, कोळीवाडा, पोलिस लाइन व इतर भागातील मिळून 24 व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आली आहे. 

दोनशेवर रुग्ण परतले घरी 
"कोरोना'बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना "कोरोना'वर मात करून घरी गेलेल्यांचा देखील आकडा दिलासा देणारा आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 571 इतकी असून, यापैकी 233 "कोरोना'बाधित रुग्णांचे अंतिम अहवाल "निगेटिव्ह' आल्याने ते बरे होऊन घरी परतले आहेत, तर 68 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com