लग्न करा धुमधडाक्यात..यंदा कितीही पाहुण्यांना बोलवा लग्नाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्न करा धुमधडाक्यात..यंदा कितीही पाहुण्यांना बोलवा लग्नाला

लग्न करा धुमधडाक्यात..यंदा कितीही पाहुण्यांना बोलवा लग्नाला

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव : गेल्या वर्षी कोरोना (Corona) संसर्गामुळे लग्नसराईत (married) पाहुण्यांच्या उपस्थितीवर निर्बंध लावले गेले होते. शंभर नंतर पन्नास पाहुण्यांच्या उपस्थितीचे बंधन होते. त्यापेक्षा अधिक पाहुण्यांची उपस्थिती असल्याचे निदर्शनास आल्यास आयोजकांसह मंगल कार्यालयांशी संबंधितांवरही गुन्हे दाखल केले जात होते. यंदा मात्र कोरोनाबाधित रुग्णच (Corona Patient) नसल्याने मंगलकार्यात पाहुण्यांच्या उपस्थितीवर कोणतेच बंधन नसल्याचे चित्र आहे. यंदा लग्नात सर्व प्रकारची वाजंत्री वाजविता येईल, कितीही पाहुण्यांना बोलावून पाहुणचार देता येणार आहे.

हेही वाचा: जळगाव : कोरोनामुळे नोंदणी विवाहाची वाढतेय क्रेझ


घरी लग्नसराई, मंगल कार्य असले, की आपल्या नात्यागोत्यातील सर्व आप्त, मित्रमंडळी आपल्या घरी यावेत, आपला पाहुणचार घ्यावा, अशी अपेक्षा असते. भारतीय संस्कृतीचा तो एक भाग पूर्वपार चालत आलेला आहे. गत वर्षी मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने लग्नसराईतील उपस्थितीवर, इतर गोष्टींवर निर्बंध आले होते. यामुळे लग्नसराईतील कोट्यवधीची उलाढाल थंडावली होती. लग्नसराईशी संबंधित टेंटवाले, वाजंत्री, सनई चौघडे, फुलांची सजावट करणारे, मंगल कार्यालय, फोटाग्राफर, व्हिडिओ ग्राफर, आचारी, वाढपी आदींचा व्यवसायच ठप्प झाला होता. व्यवसाय नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती.


मंगल कार्यालयातील उपस्थितीचे नियम न पाळल्याने अनेक मंगल कार्यालये सील होऊन आयोजक, वधू-वरांच्या संबंधितांना दंडही भरावा लागला होता. यामुळे अनेकांनी लग्न पुढे ढकलेले होते. यंदा मात्र २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विवाह मुहूर्तावर कोणीही कितीही प्रमाणात पाहुणे आमंत्रित करू शकतो. हव्या त्या प्रकारची वाजंत्री लावू शकतो. धुमधडाक्यात लग्न करू शकतो.


सर्वच मंगल कार्यालये फुल
शहरासह जिल्ह्यातील मंगल कार्यालये २०, २१ नोव्हेंबरला फुल आहेत. सर्वच वाजंत्रीवाले, घोडेवाले, लग्न लावणारे भटजी, आचारी आरक्षित झालेले आहेत. गेल्या दीड वर्षापासून लग्नसराईंशी संबंधित व्यवसायांमध्ये आलेली मरगळ यंदा झटकली जाणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: जळगाव : वैज्ञानिक होण्यासाठी मोठ्या शिक्षणाची गरज नाही


लग्नसराईत पाहुण्यांच्या मर्यादेवर बंधन नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्ण नाहीत. मात्र, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळले पाहिजे. गेले तरी तोंडावर मास्क वापरणे गरजेचे आहे. वारंवार हात सॅनिटायझर करणेही गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे.
-अभिजित राऊत, जिल्हाधिकारी

loading image
go to top