esakal | चिंताजनक...खानदेशात २३ जणांचा कोरोनाने मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

चार दिवसांतच अडीच हजार रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी दिवसभरात ६०५ नवे बाधित आढळून आल्यानंतर एकूण रुग्णसंख्या २२ हजार ३१८ झाली आहे. दिवसभरात ५०८ रुग्ण बरे झाल्यानंतरही बरे झालेल्यांची संख्या १५ हजार ४५३ झाली आहे.

चिंताजनक...खानदेशात २३ जणांचा कोरोनाने मृत्यू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : खानदेशात रविवारी (ता.२३) दिवसभरात कोरोनाच्या संसर्गाने २३ जणांचा मृत्यू झाला. यात जळगाव जिल्ह्यात ११, धुळे जिल्ह्यात सहा, तर नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला. 

जळगाव जिल्ह्याचा आकडा २२ हजार पार 
जळगाव जिल्ह्यातील नव्या बाधितांचा आकडा रोज पाच- सहाशेने वाढत आहे. रविवारी दिवसभरात नवे ६०५ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या २२ हजारांवर गेली. एकाच दिवसात तब्बल ५०८ रुग्ण बरेही झाले. गेल्या २४ तासांत ११ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ७२९ झाली आहे. 
चार दिवसांतच अडीच हजार रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी दिवसभरात ६०५ नवे बाधित आढळून आल्यानंतर एकूण रुग्णसंख्या २२ हजार ३१८ झाली आहे. दिवसभरात ५०८ रुग्ण बरे झाल्यानंतरही बरे झालेल्यांची संख्या १५ हजार ४५३ झाली आहे. आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला. त्यात सर्वच रुग्ण पन्नाशीच्या पुढचे आहेत. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर- ९७, जळगाव ग्रामीण- १३, भुसावळ- ८, अमळनेर- ९१, चोपडा- ४६, पाचोरा- ३६, भडगाव- ४७, धरणगाव- ५, यावल- २८, एरंडोल- १०१, जामनेर- ३३, रावेर- ६०, पारोळा- सात, चाळीसगाव- २९, मुक्ताईनगर- एक, बोदवड- दहा. 
पारोळ्यात हजारांवर रुग्ण पारोळा तालुक्यातील रुग्णसंख्या एक हजार पाच झाली असून, ६३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण मृतसंख्या २७ आहे. दरम्यान, रॅपिड ॲन्टिजेन टेस्टमध्ये शहरी भागात सहा व ग्रामीण भागात आठ असे १४ जण पॉझिटिव्ह आढळून आले. 

धुळे जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू 
धुळे : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी (ता.२३) २२३ बाधितांची भर पडली, तर सहा बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या २१२ वर पोचली, तर बाधितांच्या आकड्याने सात हजारांचा टप्पाही पार केला. 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जिल्ह्यातील सहा कोरोनाबाधितांचा रविवारी (ता.२३) मृत्यू झाला. यात चितोड रोड धुळे येथील ५० वर्षीय पुरुष, हट्टी (ता. साक्री) येथील ३२ वर्षीय पुरुष, फागणे (ता. धुळे) येथील ७३ वर्षीय पुरुष, न्याहळोद (ता. धुळे) येथील ५२ वर्षीय पुरुष, वडजाई (ता.धुळे) येथील ६५ वर्षीय पुरुष व थाळनेर (ता.शिरपूर) येथील रुग्णाचा समावेश आहे. एकूण ६०८ जणांचे अहवाल विविध तपासणी केंद्रांत तपासण्यात आले. यातील २२३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे बाधितांची संख्या सात हजार नऊ झाली. तर मृतांचा आकडा २१२ वर गेला. मृतांमध्ये धुळे महापालिका क्षेत्रातील १०१ व उर्वरित जिल्ह्यातील १११ जणांचा समावेश आहे. 
रविवारी आढळलेले जिल्ह्यातील कोरोनाबाधित असे : जिल्हा रुग्णालय धुळे (बाधित-४०)-खंडलाय बुद्रुक (दोन), धुळे इतर (दोन), भिडे बाग देवपूर, गल्ली नंबर- ६, वीर भगतसिंग चौक जुने धुळे (दोन), कोतवालनगर, नारायण मास्तर चाळ, सोनगीर (चार), स्वामी विवेकानंद कॉलनी, साईकृपा सोसायटी (तीन), मेहेरगाव, कापडणे (दोन), अरुणकुमार वैद्यनगर, सिद्धिविनायक हॉस्पिटल, अकलाड, बाळापूर, सुभाषनगर, दंडेवाला बाबानगर, वेल्हाणे, कलमाडी शिंदखेडा, यशवंतनगर, मार्केट यार्ड, धनूर (दोन), माणिकनगर, शिरुड, कुमारनगर, एकतानगर, जय हिंद कॉलनी (दोन), बळसाणे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (बाधित-१४)- दोंडाईचा राणीपुरा, गोपालपुरा, जनता कॉलनी, पिंपळ चौक (दोन), विद्यानगर, सिंधी कॉलनी, महादेवपुरा, दोंडाईचा, शिंदखेडा सुराय, वाडी, झिरवे, निलगोडी, दाऊळ. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (बाधित-१) शिरपूर. भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (बाधित-१८)- मेन रोड निजामपूर, भडगाव (तीन), जाम शिरसोली, नागाई कॉलनी साक्री (तीन), सटाणा रोड पिंपळनेर (पाच), महात्मा फुले कॉलनी पिंपळनेर, शिक्षक कॉलनी साक्री (दोन), नावडणे धाडणे, बाजारपेठ पिंपळनेर. महापालिका पॉलिटेक्निक कोविड केअर सेंटर (बाधित-११२)- देवपूर, गायकवाड चौक (दोन), ओसवालनगर (दोन), प्रभातनगर, साक्री रोड (तीन), वाडीभोकर रोड (दोन), सुभाषनगर (तीन), वाखारकरनगर, भाईजीनगर, जय मल्हारनगर, गल्ली नंबर- ५, मनमाड जीन, कालिका देवीनगर (दोन), गल्ली नंबर- ७, कॉटन मार्केट, भीमनगर (दोन), सौंदाणे, वडजाई, सिद्धार्थनगर, शेलारवाडी, रेवूनगर (दोन), उत्कर्ष कॉलनी, जय जवाननगर, मनपा सूतिकागृह (दोन), श्रमफल्य कॉलनी, शुभमनगर, अभियंतानगर, विष्णूनगर, सोन्या मारुती कॉलनी, गल्ली नंबर-१ (दोन), भावसार कॉलनी, औदुंबर सोसायटी, लोकमान्यनगर (तीन), पद्मनाभनगर, नगावबारी, विघ्नहर्ता कॉलनी, तिरुपतीनगर, नकाणे रोड, साक्री रोड (तीन), वीटभट्टी, मोहाडी (चार), देवपूर, गल्ली नंबर- ५ (चार), सप्तशृंगी कॉलनी(दोन), अशोकनगर, तुळशीराम नगर, सुभाषनगर (दोन), वाडीभोकर रोड, मनपा सूतिकागृह, एसआरपीएफ कॉलनी, वाखारकर नगर (दोन), शास्त्रीनगर, प्रमोदनगर, सैनिकनगर, शिवनेरी कॉलनी (दोन), वृंदावन कॉलनी, जुने धुळे (चार), संभाप्पा कॉलनी, देवपुर धुळे (चार), स्नेहनगर, वालचंदनगर, देवमोगरा कॉलनी, आधारनगर, संत गाडगेबाबा नगर, रेणुकानगर (तीन), वलवाडी, गोंदूर रोड (दोन), चक्करबर्डी, कुमारनगर (पाच), इतर धुळे (तीन), तिखी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे (बाधित-१०)- धुळे, सहजीवननगर, साक्री रोड, जीएमसी (दोन), शिरपूर, सोनगीर, सौंदाणे, शिंदखेडा, दोंडाईचा. खासगी लॅब (बाधित-२८)- नगाव, नकाणे रोड, परिवहन कॉलनी, रामवाडी शाखेजवळ मालेगाव रोड (दोन), जय जवान चौक, बडगुजर कॉलनी, नित्यानंद नगर, इंदिरा कॉलनी दत्त मंदिर, रामचंद्रनगर, अग्रवालनगर, पाडवी सोसायटी नगाव बायपास, प्रमोदनगर सेक्टर- २ (दोन), सुभाषनगर, सप्तशृंगीनगर, कृषिनगर, शास्त्रीनगर दोंडाईचा, कामपूर विखरण (दोन), कापडणे, शिवाजी रोड जैताने, कंदाणे, न्याहळोद, विठ्ठल मंदिर चौक लामकानी, सोनगीर, साक्री रोड (दोन). 

नंदुरबार जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू 
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाने एकाच दिवशी सहा रुग्णांचा रविवारी (ता.२३) मृत्यू झाला. मार्च ते आजअखेर पहिल्यांदाच एकाच दिवशी मृत्यू होणाऱ्यांचा आकडा अधिक होता. यात पाच पुरुष व एका महिलेच्या समावेश आहे. दिवसभरातून पुन्हा ९५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. ४६ जणांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. 
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील ६० वर्षीय पुरुषाच्या कोरोना पॉझिटिव्ह अहवाल ११ ऑगस्टला प्राप्त झाला होता. त्याचप्रमाणे तळोदा येथील साठवर्षीय पुरुषाला १६ ऑगस्टला लागण झाली होती. या दोघांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. नंदुरबार येथील ७० वर्षीय पुरुषाला २१ ऑगस्टला बाधा झाली होती. उपचार सुरू असताना त्याचाही आजच सकाळी मृत्यू झाला. लोणखेडा (ता. शहादा) येथील ५४ वर्षीय महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल शनिवारी (ता.२२) प्राप्त झाला. उपचार सुरू असताना दुपारी साडेतीनला त्यांचा मृत्यू झाला. तसेच श्रावणी (ता. नवापूर ) येथील ६८ वर्षीय पुरुष व तळोदा येथील ५१ वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला. 
आज दुपारी साडेतीनला स्वॅबचा पहिला अहवाल आला. त्यात ९३ पैकी २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात नंदुरबार सहा, शहादा १८, अक्कलकुवा दोन, बाहेरील जिल्ह्यातील एक रुग्णाचा समावेश होता. सायंकाळी सहाला दुसरा अहवाल प्राप्त झाला. यात ९४ पैकी ४७ व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले. यात नंदुरबार ३३, शहादा १२, तळोदा १,नवापूर १ आदींचा समावेश होता. तर रात्री आठचा अहवालात पुन्हा २१ जण पॉझिटिव्ह आले. त्यात नंदुरबार ५, शहादा १५, बाहेरील जिल्हा -१ असे दिवसभरातून ९५ जणांचा अहवाल प्राप्त झाला. दरम्यान ४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे