बाधितांचा आकडा आज शंभरीच्या आत; दोघांचा मृत्‍यू

coronavirus update
coronavirus update

जळगाव : जिल्‍ह्‍यात कोरोना वाढीचा प्रभाव मंदावला आहे. मागील तीन दिवस दीडशेच्या घरात पॉझिटीव्ह रूग्‍ण आढळून आल्‍यानंतर आज नव्याने बाधा झालेल्‍या रूग्‍ण संख्येत घट झाली. जिल्‍ह्‍यात दिवसभरात केवळ ९८ पॉझिटीव्ह रूग्‍ण आढळून आले असून २२५ रूग्‍ण बरे होवून घरी परतले आहेत.
सलग तीन- चार आठवड्यांपासून जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा उद्रेक कमी झाला आहे. रूग्‍ण संख्या कमी आढळून येत असून बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे एकूण बाधित आणि बरे झालेल्‍या रूग्‍ण संख्येतील तफावत कमी झालेली आहे. आजअखेरपर्यंत जिल्‍ह्‍यात एकूण पॉझिटीव्ह रूग्‍णांची संख्या ५२ हजार ३८८ झाली आहे; तर बरे होवून घरी गेलेल्‍या संख्या ४९ हजार ५७९ वर पोहचली आहे. यामुळे जिल्‍ह्‍यासाठी हे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मात्र कोरोनामुळे मृत्‍यू होणाऱ्यांची संख्या थांबलेली नाही. आज देखील जिल्‍ह्‍यात दोघांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला.

दीड हजार ॲक्‍टीव रूग्‍ण
कोरोना बाधितांची संख्या कमी आढळून येत असल्‍याने झपाट्याने वाढणारा कोरोना बाधितांचा आकडा मंदावला आहे. तर बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्‍णसंख्येचा रेशीओ गेल्‍या तीन आठवड्यांपासून वाढला आहे. तरी देखील आजच्या स्‍थितीला जिल्‍ह्‍यात १ हजार ५५९ कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. यात लक्षण असलेले केवळ ४५६ तर लक्षण नसलेले १ हजार १०३ रूग्‍ण आहेत.

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर ३८, भुसावळ १३, अमळनेर ३, चोपडा ४, पाचोरा ३, भडगाव १, धरणगाव १, यावल ३, जामनेर ९, रावेर ११, चाळीसगाव ४, मुक्‍ताईनगर ४, बोदवड ३, इतर जिल्‍ह्‍यातील १ रूग्‍णाचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com