esakal | जळगाव मनपा बरखास्‍तीची होतेय मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon corporation

महापालिकेने गेल्या काही वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून त्यांच्या हिस्स्यातील भविष्य निर्वाह निधीची रक्कम कापून घेतली पण या रकमेसह मनपाचा हिस्साही भरला नाही. अंशदानाच्या रकमेबाबतही तोच घोळ केला. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेतनातून कापून घेतले,

जळगाव मनपा बरखास्‍तीची होतेय मागणी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीचा हिस्सा कापून तो संबंधित विभागाला न भरणे, अंशदान तसेच कर्जाचे हप्ते कापूनही ते जमा न करणे अशा विविध स्वरुपाच्या २२ कोटींची देणी महापालिकेने थकीत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चौकशी करुन महापालिका बरखास्त करावी व प्रशासक म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी केली आहे. 
यासंदर्भात पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोशयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेने गेल्या काही वर्षात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून त्यांच्या हिस्स्यातील भविष्य निर्वाह निधीची रक्कम कापून घेतली पण या रकमेसह मनपाचा हिस्साही भरला नाही. अंशदानाच्या रकमेबाबतही तोच घोळ केला. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेतनातून कापून घेतले, मात्र ते संबंधित कार्यालयात जमा केले नाही. त्यामुळे त्यावरील अतिरिक्त व्याजाचा भूर्दंड मनपावर पडणार आहे. शिवाय, भविष्य निर्वाह निधीची रक्कमच जमा होत नसल्याने कर्मचारी त्या व्याजापासूनही वंचित राहणार आहेत. 

प्रशासनाची जबाबदारी 
कर्मचारी वेतन, त्यातील कपात व संबंधित विभागांना रक्कम अदा करणे आदी सर्व हिशोबाची जबाबदारी प्रशासन म्हणून महापालिका आयुक्त, लेखाधिकारी, लेखापाल यांची आहे. सत्ताधारी म्हणून भाजपनही या बाबींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मात्र, कुणीही जबाबदारी पार पाडलेली दिसत नाही. 

चौकशी करुन बरखास्त करा 
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन महापालिका बरखास्त करावी. तसेच मनपावर प्रशासक म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी अभिषेक पाटलांनी या निवेदनातून केली आहे. 

अशी आहे थकीत देणी 
- भविष्य निधी : ७५८९०८०४ 
- परिभाषित अंशदान योजना : ५५२१५४२ 
(मनपा हिस्सा १०%) 
- ग.स. सोसायटी हप्ते : १२४५४१८ 
- व्यवसाय कर : ६७९५५ 
- आयकर : १०७७०० 
- गट विमा : २५२० 
- कंझ्युमर्स सोसायटी : ३८२६६९ 
- चतुर्थ कर्मचारी. सोसायटी : ११७५८४७ 
- मृत्यूनिधी : ३०७५९०० 
- धुळे व नंदूरबार सोसायटी : ३५९७३७ 
- न्यायालयीन रोजंदारी भविष्य निधी : २३११०० 
- इतर देणी : २४२४३८१ 
- एकूण : २१कोटी ७५लाख १९हजार ७७४