आईला अपशब्‍द बोलल्‍याचा राग; तलवार काढून डोक्‍यात वार

आईला अपशब्‍द बोलल्‍याचा राग; तलवार काढून डोक्‍यात वार
jalgaon crime news
jalgaon crime newsjalgaon crime news
Updated on

रावेर (जळगाव) : आईला अपशब्द बोलण्याच्या कारणावरून संतप्त (Crime news) झालेल्या मुलाने त्या इसमाचा तलवारीने डोक्यात वार करून जिवेठार मारल्याची घटना शहरातील संभाजीनगरात घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सदर संशयितास पोलीसांनी अटक केली असून, त्यास येथील न्यायालयासमोर (Jalgaon court) नेले असता त्‍यास तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. (jalgaon-crime-raver-late-night-sword-struck-his-head)

jalgaon crime news
जळगाव शहरासह परिसरात जलधारा; दमदार पावसाची प्रतीक्षा

रावेर शहरातील संभाजीनगर भागात वास्‍तव्‍यास असलेले राजू देवराम चौधरी (वय ५५) हे पुष्पाबाई मराठे यांना अपशब्द बोलले. अपशब्‍द बोलण्याच्या कारणावरून पुष्पाबाई यांचा मुलगा रविंद्र संतोष मराठे याने रागाच्या भरात तलवारीने राजू चौधरी यांच्या डोक्यावर तलवारीने वार करत गंभीर जखमी केले. सदर घटना सोमवारी (ता.१३) रात्री उशिरा घडली.

उपचारादरम्‍यान मृत्‍यू

जखमीला जळगाव येथे खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना राजु चौधरी यांचे आज निधन झाले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे, मनोहर जाधव, अनिस शेख यांनी घटनास्थळी दाखल झाले. या भागात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

jalgaon crime news
माजी आमदार संतोष चौधरींचा पोलिसांकडून शोध; या प्रकरणी पोलिसात गुन्‍हा

तीन दिवसाची पोलिस कोठडी

मयताचा भाऊ गणेश चौधरीच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात संशयित संतोष मराठे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी त्यास अटक केली आहे. त्यास येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक पुढील तपास करीत आहेत.

पुतण्याचा आज होता साखरपुडा

सदर घटनेत मृत झालेले राजू देवराम चौधरी यांचा लहान भाऊ मधुकर चौधरी यांचा मुलगा भोलानाथचा आज (ता. १५) साखरपुडा होता. भोलानाथ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात नोकरीला आहे. मात्र साखरपुड्याच्‍या आदल्या रात्रीच ही घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com