एकनाथ खडसेंच्या पतसंस्थेतील ठेवी ठेविदारांना परत मिळाल्या नाही

देविदास वाणी
Saturday, 5 December 2020

खडसे यांचा थेट संबंध असो वा नसो आपल्याला याच्याशी काही देणे-घेणे नाही. तथापि, आपल्या नावाने पतसंस्था असल्याने खडसे यांनी ठेविदारांना न्याय मिळवू द्यावा.

जळगाव ः माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहारा प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला आहे. ज्याप्रमाणे नाथाभाऊंनी बीएचआरच्या प्रकरणात आवाज उठविला. त्याप्रमाणे वरणगाव येथील श्री एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी आवाज उठवून त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी ठेवीदारांसह माहिती दीपककुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत केली. 

आवश्य वाचा- अरेच्चा : 92 वर्षाचे धनुकाका बनले तरुणांचे 'आयकाँन'

वरणगाव येथील रिक्षाचालक प्रकाश रघुनाथ चौधरी व यादव जगन्नाथ पाटील यांनी गावातील श्री एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्थेत २००६ मध्ये ठेवी ठेवल्या होत्या. मात्र ही पतसंस्था बुडाली असून यात अनेकांच्या ठेवी बुडालेल्या आहे. ठेवींबाबत यादव पाटील यांनी काही वर्षांपुर्वी श्री.खडसेंची भेट घेतली होती. त्यावेळी श्री.खडसे म्हणाले, होते की ‘मी नाही बोललो होते मात्र तरी देखील माझे पतसंस्थेला नाव दिले आहे. माझा या पतसंस्थेसोबत काही संबंध नाही. 

अनेक पतसंस्थेत बुडाल्या ठेवी 
यादव पाटील यांनी एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर शेती सहकार पतसंस्था, धनवर्धीनी सहकारी पतसंस्था मर्यादीत, महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी, लोक कल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत याठिकाणी ठेवी ठेवल्या होत्या. परंतु अद्याप त्यांना कुठल्याच पतसंस्थेकडून ठेवी परत न मिळाल्या नाही. त्यामुळे नाथाभाऊंनी बीएचआप्रमाणे या पतसंस्थाचा देखील पाठपुरावा करावा. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन न्याय मिळवून देण्याची मागणी ठेवीदारांनी केली. 

एकनाथराव खडसे ग्रामीण बिगर-शेती सहकारी संस्था ही दुसर्‍याच संचालकांनी सुरू केली असून याचा नाथाभाऊंशी काहीही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. यांच्याशी खडसे यांचा थेट संबंध असो वा नसो आपल्याला याच्याशी काही देणे-घेणे नाही. तथापि, आपल्या नावाने पतसंस्था असल्याने खडसे यांनी ठेविदारांना न्याय मिळवू द्यावा अशी मागणी गुप्ता यांनी याप्रसंगी केली.
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon depositors did not get back deposits in eknath khadse's credit union