ना गजर,ना गुलाची उधळण तरीही गणरायाच्या आगमणाचा द्विगुणीत उत्साह

ना गजर,ना गुलाची उधळण तरीही गणरायाच्या आगमणाचा द्विगुणीत उत्साह
Updated on

जळगाव ः गणेशोत्सव म्हटला म्हणजे, ढोल ताशे, झांज यांचा कानठिळ्या बसविणारा आवाज, विविध कलाकुसरीची प्रत्येक्षिके दाखविणारे पथक, झांज पथकांच्या रंगीत तालीमी, कसरतीचे खेळ दाखविणारे युवक. गणपती बाप्पा...म्हटले की ..आपोआप मुखातून येणारे शब्द ‘मोरया…, एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार..’ वाद्या विना गणेशोत्सव बहुदा पहिल्यादाच राज्यात साजरा होत आहे. असे असे असले तरी गणेश भक्तांचा उत्साह दांडगा असल्याचे दिसून आले. विघ्नहर्त्या गणेशाला एकच आळवणी सर्वानी केली असेल ती म्हणजे ‘कोरोना’ जाऊ दे, सर्वांना सुखी ठेव अशी. 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पुण्यात लोकचळवळीसाठी गणेशोत्सव सुरू केला. इंग्रजांच्या तावडीतून भारताला सोडविण्यासाठी लोकचळवळ असायला हवी. गणेशोत्सवात त्याबाबत लोकांना पारतंत्र्य, गुलामगिरी विरूध्द प्रबोधन करायचे, त्याद्वारे लोकांच्या मनात इंग्रजाविरुद्ध संतापाची लाट येईल. ते बंड करतील भारत पारतंत्र्यातून स्वतंत्र होईल एवढा मोठा विचार गणेशोत्सवाची परंपरा सुरू कऱण्यामागील होता. अधिकाधिक लोक या उत्सवानिमित्त एकत्र आणून त्यांचे प्रबोधन करणे हा उद्येश होता. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे लोकांना एकत्र आणण्यावरच बंदी आहे. अशाही स्थितीत मोठी गणेश मंडळे मोठ्या मूर्ती, आरास देखावे टाळून, आरोग्यविषयक मार्गदर्शन, प्रबोधन, तपासणी शिबिर घेण्यावर भर देत आहेत. गणेशोत्सवाच्या झगमगाट ऐवजी नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधा देण्याची परंपरा सुरू करणारा हा उत्सव ठरावा असे स्वरूप यंदाच्या गणेशोत्सवाचे आहे. 

पाच लाखांची उलाढाल ठप्प 
शहरात गणेश मंडळ दरवर्षी श्रींच्या आगमनाची मिरवणूक काढतात. त्यासाठी लागणारे ढोल ताशे वाजविणारी मंडळी टॉवर चौक, चित्रा चौक, अजिंठा चौफुली याठिकाणी येत असे. त्याठिकाणी तासाप्रमाणे दर ठरला की, संबंधित ढोल ताशे त्या गणपती मंडळाच्या वाहनासमोर गणेश मूर्ती खरेदीपासून मूर्तीची स्थापना होईपर्यंत वाद्यांची साथ संगत करीत असे. तसेच वाजंत्री, डी.जे.चालकांचे असायचे. यंदा मात्र ढोल ताशे, वाजंत्री, डी.जे.वाजविण्यावर बंदी असल्याने या यंत्रणेतील सर्वांनाच आजच्या दिवशी रोजगार मिळाला नाही. ढोल ताशे, वाजंत्री, डी.जे. चालकांना शहरात दरवर्षी सुमारे पाच लाखांची उलाढाल होत होती. ती आज ठप्प झाली होती. 

मास्क लावून 
वाद्याविनाच अनेक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लोटगाडीवर, वाहनांवर श्रींचा जयघोष करीत मूर्ती आपापल्या ठिकाणी भर दिला. मध्येच पावसाची सर आली की गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित होत असे. दिवसभरात जिल्ह्यात अडीच हजारांवर गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क तर बांधला होताच. ‘मोरया...मोरया’अशी रिबीनही डोक्याला बांधून पक्का गणेश भक्त असल्याची चुणूक दाखवीत होता. 

प्रथमच ध्वनी प्रदुर्षण नाही 
गणेशोत्सवात ढोल, ताशांसह डि.जे.च्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान बालकांच्या कानावर परिणाम होवून ते अशंतः किंवा पूर्णतः बहिरे झाल्याच्या घटना मागे घडल्या आहेत. यंदाच्या उत्सवात मात्र कर्णकर्कश आवाज नसल्याने बहिरत्व निर्माण होण्याच्या घटना टळतील हे नक्की. गणेशोत्सवात प्रथमच ध्वनी पूदुर्षण होणार नाही. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com