
जळगावच्या रथोत्सवास १५० वर्षाची परंपरा आहे. यामुळे परंपरा खंडीत करण्याऐवजी केवळ मंदिरा भोवती रथ फिरण्यास परवानगीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
जळगावचा रथोत्सवाचे भाविकांना मिळणार ऑनलाईन दर्शन
जळगाव ः येथील जुने जळगाव परिसरातील श्रीराम मंदिर व रथोत्सव समितीतर्फे दरवषी कार्तिकी एकदशीला रथोत्सव काढण्याची १५० वर्षाची परंपरा आहे. यंदा कोरोना संसर्गामुळे रथोत्सव साजरा होईल. मात्र गावात रथ फिरणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रथोत्सव समितीसोबत घेतलेल्या बैठकीत सांगितले.
आवश्य वाचा- मुख्यमंत्री केवळ माझं कुटूंब..’चा टेप वाजवताय, आतातरी कृती करा-चित्रा वाघ
महापालिकेत रथोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. यावेळी आमदार सुरेश भोळे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, समितीचे पदाधिकारी, आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.
कोरोना संसर्गामुळे रथोत्सव काढता येणार नाही सांगितल्यावर रथोत्सव समिती सदस्यांनी केवळ श्रीराम मंदिरा भोवती रथ फिरण्यास परवानगी द्यावी. आम्ही गर्दी होवू देणार नाही. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करू असे सांगितले. त्यावर जिल्हधिकारी राउत यांनी श्रीराम मंदिराभोवतीच फिरवावा त्याची पाहणी आयुक्तांनी करावे असे सांगून अहवाल द्यावा असे सांगितले. त्यानूसार सायंकाळी आयुक्तांसह आमदार भोळेंनी रथ फिरविणाऱ्या परिसराची पाहणी केली. मंदिरा भोवतीचा परिसर पाउण किलो मिटरचा आहे. तसा अहवाल सादर झाला. रथ निघाल्यानंतर त्याचे दर्शन भावीकांना ऑनलाईन पध्दतीने, फेसबुकद्वारे करविण्यात येणार आहे.
जळगावच्या रथोत्सवास १५० वर्षाची परंपरा आहे. यामुळे परंपरा खंडीत करण्याऐवजी केवळ मंदिरा भोवती रथ फिरण्यास परवानगीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्यांनी ती मान्य केली आहे.
आमदार सुरेश भोळे
संपादन- भूषण श्रीखंडे
Web Title: Marathi News Jalgaon Devotees Jalgaon Shri Ram Ratho Utsow Festival Will Get Online
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..