लॉकडाऊन वाढवले तर..भाजप असहकार आंदोलन करणार ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Non cooperation movement

लॉकडाऊन वाढवले तर..भाजप असहकार आंदोलन करणार !

नंदुरबार: सलग दळणवळण (Transportation close) बंदीमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची (Professional) प्रचंड आर्थिक कोंडी झाली असून व्यावसायिक उद्रेकी मनस्थितीत आहेत. तरीही लॉकडाऊन वाढवला जात असेल; तर मात्र भारतीय जनता पार्टी (bjp) जिल्हाभरात असहकार आंदोलन (Non cooperation movement) पुकारेल; असा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी ( BJP District President Vijay Chaudharyयांनी दिला. ( Nandurbar lockdown increased BJP non-cooperation movement)

हेही वाचा: खरीपपूर्व कापूस लागवडीची तयारी पूर्ण..पण उत्पादन घटण्याची भीती !

भाजप आणि जिल्ह्यातील दुकानदार व व्यवसायिकांकडून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (Collector Dr. Rajendra Bharud) यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सध्या जिल्ह्यातील कोरोना स्थिती सुधारुन रुग्ण संख्या घटली आहे. एप्रिलच्या प्रारंभापासून जे दररोज सरासरी १२०० रुग्ण आढळू लागले होते आज ते सरासरी २०० वर प्रमाण आहे. आधीपेक्षा बरे होऊन परतणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. तसेच हजारोच्या संख्येने बेड रिकामे पडले आहेत. एकूणच कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र आहे. तथापि आधी जिल्हा प्रशासनाने आणि नंतर राज्य शासनाने लॉकडाऊन वाढवत नेला. त्यामुळे सलग दीड महिन्यांपासून म्हणजे १ एप्रिल ते १५ मे पर्यंतच्या बंदमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे.


वर्षभर आधीपासून बाजारपेठेतील प्रत्येकाची उलाढाल थांबलेली आहे. अशात लॉकडाऊन वाढवणार असल्याच्या वृत्ताने सगळे हवालदिल झाले असून उद्रेकी मनस्थितीत आहेत. महिनो महिने उत्पन्न थांबल्याने प्रत्येक व्यावसायिक तसेच गरीब श्रमिक वर्ग मनाने उद्ध्वस्त झाला आहे. विविध वस्तू, साहित्य आणि पदार्थ हातलॉरीवर विकणारे लहान विक्रेते, छोटे-छोटे दुकानदार, शिलाई काम करणारे, सलून चालवणारे, लोहारकाम, सुतारकाम करणारे, सौंदर्य प्रसाधने आणि तत्सम गोष्टींची विक्री करणारे छोटे व्यावसायिक व कष्टकरी श्रमिकांवर अक्षरश: उपासमारी आली आहे.

व्यवसायीक अडचणीत..

सर्व क्षेत्रांशी संबंधीत विक्री करणाऱ्या मोठ्या दुकानदारांना आणि छोट्या व्यावसायिकांना, विक्रेत्यांना तर दरमहिन्याचे वीज बील, जागेचे भाडे, त्यांच्यावर विसंबलेल्या माणसांचा पगार, बँक-पतपेढ्यांचे हप्ते, होमलोनचे हप्ते कुठून अदा करायचे? असे प्रश्‍न उभे राहिले असून व्यवसाय बंद असला तरी दरमहिन्याचे खर्च कोणालाही माफ झालेले नाहित, असे म्हटले आहे. निवेदनावर भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्‍हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष पंकज जैन, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शहा आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

हेही वाचा: जळगावकरांसाठी महत्वाची बातमी.. तीन दिवस किराणा दुकाने बारापर्यंत राहणार सुरु !

व्यवसायिकांना संपवणारा घोर अन्याय
लॉकडाऊन हा कोरोना महामारीवरील उपाय वाटण्याऐवजी व्यवसायिकांना संपवणारा व उपासमार घडवणारा घोर अन्याय वाटू लागला आहे. म्हणून १५ मे २०२१ नंतर कोणत्याही कारणास्तव लॉकडाऊन वाढवला जाऊ नये, तसेच १५ मे पासून सर्व व्यावसायिकांना सूट देऊन व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यास परवानगी द्यावी, अथवा त्यांना दिवसातील सकाळपासून सायंकाळपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. व्यावसायिक तसेच नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत झालेला असतानाही लॉकडाऊन वाढवला जात असेल तर भाजप जिल्हाभरात असहकार आंदोलन पुकारेल. तत्कालीन स्थिती पाहून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही दिला आहे.

( Nandurbar lockdown increased BJP non-cooperation movement)

Web Title: Marathi News Nandurbar Lockdown Increased Bjp Non Cooperation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bjp
go to top