चिंताजनक : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे पून्हा रुग्ण संख्या वाढू लागली

चिंताजनक : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे पून्हा रुग्ण संख्या वाढू लागली
Updated on

जळगाव  : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र जानेवारी महिन्यात असताना फेब्रुवारीत सातत्याने दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारीही अवघ्या सहाशे चाचण्यांमधून तब्बल ४९ नवे रुग्ण आढळून आले. तर दोघांचा बळी गेला. 

जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा कोरोना रुग्णसंख्या वाढविणारा ठरला आहे. दुसऱ्या आठवड्यातही नवे बाधित दररोज अधिक आढळून येत असून त्या तुलनेत बरे होणाऱ्याची रोजची संख्या कमी होताना दिसते. बुधवारी अवघ्या सहाशे चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ४९ नवे रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५७ हजार ४३८ झाली. तर २७ जण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५५ हजार ७०६वर पोचला आहे. दरम्यान, मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर बुधवारी पुन्हा दोघा रुग्णांचा बळी गेला असून हे दोघेही रुग्ण जळगाव शहरातील आहेत. 
 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर १८, भुसावळ ५, पारोळा ९, भडगाव व चाळीसगाव प्रत्येकी ३, चोपडा व यावल तालुक्यात प्रत्येकी २, जळगाव ग्रामीण, रावेर, पाचोरा, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण सापडला. 


प्राचार्य पॉझिटिव्ह 
जळगाव शहरात दररोज रुग्णसंख्या वाढताना दिसते. बुधवारीही शहरात १८ नवे रुग्ण आढळून आले. त्यात एका महाविद्यालयीन प्राचार्यांचा समावेश आहे. त्यामुळे गुरुवारी या महाविद्यालयात सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे. महाविद्यालये सुरु होण्याच्या बेतात असताना प्राचार्य पॉझिटिव्ह आल्याने शैक्षणिक वर्तुळात भीती पसरली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com