esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

District Bank Election

जिल्हा बँक निवडणूकः सर्वपक्षीय पॅनेलमधून काँग्रेसची फारकत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भाजप (BJP) हा जातीयवादी पक्ष असून आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही अशी भूमिका घेत काँग्रेसने (Congress) जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (District Bank Election) सर्व पक्षिय पॅनेलमधून माघार घेत धक्का दिला आहे. मात्र, भाजप वगळून महाविकास आघाडी करण्यास आमची तयारी असल्याचे सांगत अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

हेही वाचा: जळगाव : आव्हान निधी जिल्ह्यास मिळण्यासाठी आय पास प्रणालीचा उपयोग करा


जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला सुरवात झाली आहे. या निवडणुकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय पॅनेलची तयार केले होते. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली समितीही निश्‍चित करण्यात आली होती. यात काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्यासह आताचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचा समावेश आहे. मागील आठवड्यात या समितीची बैठक होऊन भाजप ७, राष्ट्रवादी ७, शिवसेना ५ आणि काँग्रेस २ असे जागावाटप ठरले होते. या जागा वाटपाला अंतिम स्वरूप मिळत नाही तोच जिल्हा काँग्रेसने पुन्हा एकदा कोलांटउडी घेत स्वबळाचा नारा दिला आहे.


प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, की जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनेल तयार करण्यात आले होते. या पॅनेलच्या कोअर कमिटीची बैठकही पार पडली. यात जे जागा वाटप झाले त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती पालकमंत्र्यांकडून देण्यात आली नाही. आम्हाला बातम्यांच्या आधारे या जागा वाटपाची माहिती मिळाली. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हेच सूत्र कायम ठेऊन जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडी म्हणून पॅनेल होत असेल तर आमची तयारी आहे. जातीयवादी असलेल्या भाजपसोबत आम्ही जाणार नाही.

हेही वाचा: जळगाव : बसचालकाला मारझोड पडली महागात


.. तर स्वबळावर
सत्ताधारी मित्रपक्षांना आम्ही विनंती करणार असून विनंती मान्य न झाल्यास आम्ही जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढू, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या घोषणेमुळे जळगाव जिल्हा बँकेत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या सर्वपक्षीय पॅनेल आता होणार नाही. मात्र शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस याचे महाविकास आघाडी पॅनेल होणार की, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार याकडेच आता लक्ष असणार आहे. पत्रकार परिषदेस जामनेर तालुकाध्यक्ष शरद पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष संतोष पाटील, एरंडोल विधानसभा अध्यक्ष इमरान मुश्ताक, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, आबासाहेब निकम (चाळीसगाव), पारोळा तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान, जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, भडगाव शहराध्यक्ष दिलीप शेंडे, दिलीप पाटील (बोदवड), डॉ. जगदीश पाटील (मुक्ताईनगर), सचिन सोमवंशी (पाचोरा), मनोज सोनवणे, ज्ञानेश्‍वर कोळी, उद्धव वाणी आदी उपस्थित होते.

loading image
go to top