esakal | जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्ण अडीचशेच्या टप्प्यात
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्ण अडीचशेच्या टप्प्यात

जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्ण अडीचशेच्या टप्प्यात

sakal_logo
By
टीम ई सकाळजळगाव :
जिल्ह्यातील कोरोना (Corona) संसर्ग आटोक्यात येत असताना, आता सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या अडीचशेच्या टप्प्यात आली आहे. दिवसभरात नवीन १५ रुग्ण आढळून आले, तर २२ जणांनी कोरोनावर मात केली. सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात मृत्यूची (No Death) नोंद झाली नाही. (jalgaon district corona active patient low)

हेही वाचा: जळगाव मनपात बंडखोर नगरसेवकांचा पून्हा भाजपला दे धक्का!


जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने ‘नवीन बाधित कमी व बरे होणारे अधिक’, असे चित्र आहे. महिनाभरापासून रोजच्या रुग्णांची संख्या ५०च्या आत राहत असून, त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्याही घटत आहे. सोमवारी सुमारे अडीच हजार चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले.

हेही वाचा: भीषण दुर्घटना; कार-दुचाकीच्या अपघातात तीन ठार

त्यापैकी केवळ १५ रुग्ण बाधित आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख ४२ हजार ४६९ झाली आहे, तर २२ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ६३८ वर पोचला आहे. सोमवारच्या नोंदीनुसार जिल्ह्यात आता २५७ सक्रिय रुग्ण राहिलेत. जिल्ह्यात सोमवारी जळगाव शहरात तीन, भुसावळ तालुक्यात तीन, यावल- एक, चाळीसगाव- तीन, रावेर- दोन व अन्य जिल्ह्यातील एक असे रुग्ण आढळून आले.

loading image