esakal | जळगावः कोरोनाचा धोका अद्यापही कायम..आठवडाभरात दुसरा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

जळगावः कोरोनाचा धोका अद्यापही कायम..आठवडाभरात दुसरा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : जून, जुलैपासून कोरोना (Corona) संसर्ग नियंत्रणात असला तरी कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. १६ जुलैपासून जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झालेला नसताना आठवडाभरात दोघांच्या बळीमुळे चिंता वाढली आहे. दुसरीकडे एक-दोन रुग्ण दररोज समोर येत असल्याने अजूनही काळजी घेण्याची गरज आहे.

हेही वाचा: पारोळाः पैशांचा वाद..आईसमोरच विवाहित मुलीचा विषपाजून खून


जळगाव जिल्ह्यात जूनपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तर रुग्णसंख्या कमालीची घटली. सक्रिय रुग्णसंख्याही खाली येऊन दहाच्या आत नोंदली गेली. सध्या दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या अगदीच नगण्य म्हणजे दररोज एक-दोन अशी आहे. आठवड्यातील दोन-तीन दिवस तर एकाही रुग्णाची नोंद नसते.

हेही वाचा: साक्रीः लग्नापूर्वी तरुणावर काळाची झडप..डेंग्यूमुळे मृत्यू


दोघांचा बळी
असे असले तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. चार दिवसांपूर्वी एका ६७ वर्षीय इसमाचा जळगाव शहरात मृत्यू झाला. तर गुरुवारी पुन्हा भुसावळातील ६९ वर्षीय पुरुषाचा बळी गेला आहे. म्हणजे आठवडाभरात दोन जण दगावल्याने आरोग्य यंत्रणा ॲलर्ट झाली आहे. गुरुवारी प्राप्त १८०० चाचण्यांच्या अहवालातून जळगाव शहर व भुसावळमधून प्रत्येकी १ असे २ रुग्ण समोर आले. सध्या सक्रिय रुग्णसंख्या १२ झाली आहे.

loading image
go to top