कौटुंबीक वादातून पतीने केला पत्नीचा खुन; शालकावरही हल्ला

पतीच्या विरोधात पुजा यांनी पाळधी पोलीसात तक्रार दिली होती.
crime
crimecrime


जळगाव : कौटुंबिक (Family dispute) वादातून पाळधी येथे माहेर असलेल्या पत्नीचा (Wife) चाकू भोसकून खून (Murder) केल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. संशयित आरोपी पतीला गावकऱ्यांनी पकडून पोलीसांच्या (Police arrest) स्वाधिन केले आहे.
( paldhi village family dispute husband kills wife)

crime
स्‍टेट बँकेचे एटीएमच लांबविले; चाळीसगाव येथील मध्‍यरात्रीची घटना

पुजा सुनिल पवार (वय-२६ रा. शिवाजी नगर) या विवाहितेच पाळधी (ता. धरणगाव) येथील माहेर आहे. चुलत भाऊ मंगेश चव्हाण याचे लग्न असल्यामुळे त्या १६ फेब्रुवारीपासून माहेरी पाळधी येथे राहत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून पती सुनिल बळीराव पवार (वय-३६) रा. शिवाजी नगर यांच्याशी कौटुंबिक वाद निर्माण झाले होते. त्यामुळे चुलतभावाच्या लग्नापासून विवाहिता ह्या पाळधी येथे माहेरी राहत होत्या. यासंदर्भात पतीच्या विरोधात पुजा यांनी पाळधी पोलीसात तक्रार दिली होती.

बाजारपेठेत पत्नीला मारहाण

चौकशीकामी त्यांना आज पोलीसांनी सुनिल पवार याला पोलीसात बोलविण्यात आले होते. याचा राग पती सुनिल पवार यांच्या मनात होता. दरम्यान, आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पतीसोबत विवाहिता पुजा ह्या बाजारात आल्या होत्या. त्याठिकाणी दोघांचे खटके उडाले. त्यामुळे संतापाच्या भरात पती सुनिल पवार याने बाजार पेठमध्ये पत्नी पुजाला मारहाण करण्यास सुरूवात केली.

Death
DeathDeath

चाकुने केले वार..

पतीच्या तावडीतून सुटून पत्नी मारवाडी गल्लीत असलेल्या माहेरी पोहचल्या. त्याच अवस्थेत पती सुनिल पवार याने पत्नीला चाकूने भोसकून ठार केले तर शालक शंकर भील चव्हाण याला देखील जखमी केले. घटनेची माहिती मिळताच गल्लीतील ग्रामस्थांनी संशयित आरोपी पती सुनिल पवार याला पकडून पाळधी आऊट पोस्ट पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

crime
‘त्यांना’ ३८ वर्षांनंतर मिळाली स्वमालकीची जमीन

पोलिसात गुन्हा दाखल

मयत पुजाच्या पश्चात मुलगी भाग्यश्री, भावना आणि मुलगा ओम असा परिवार आहे. मयत पुजाचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्‌यालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com