esakal | जळगावमध्ये बरे होणाऱ्यांपेक्षा नवे रुग्ण अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

जळगावमध्ये बरे होणाऱ्यांपेक्षा नवे रुग्ण अधिक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी (ता. २०) प्राप्त अहवालात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन बाधित रुग्ण अधिक असल्याचे चित्र समोर आले. दिवसभरात १२ नवीन रुग्ण (Corona Patient) आढळून आले, तर दहा रुग्ण बरे झाले. जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर अशी स्थिती निर्माण झाली आहे.

(jalgaon district corona patient increase after tow months)

हेही वाचा: तिसऱ्या लाटेची तयारी;कोविड रुग्णांसाठी मोहाडी रुग्णालय सज्ज


जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा आलेख दोन-अडीच महिन्यांपासून उतरता आहे. गेल्या महिनाभरात तर दररोजची रुग्णसंख्या दोन आकडी संख्येत आहे. शिवाय नव्याने बाधितांपेक्षा दररोज बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असा ट्रेंड कायम होता. मात्र दोन-अडीच महिन्यांनंतर बरे होणारे कमी व नवे बाधित जास्त, असे चित्र समोर आले.

नवीन १२ रुग्ण आले बाधीत

मंगळवारी प्राप्त तीन हजार २६० चाचण्यांच्या अहवालातून १२ बाधित आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४२ हजार ५३४ झाली असून, बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ८४५ वर पोचला आहे.

हेही वाचा: हतनूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस;धरणाचे दहा दरवाजे उघडले

जळगावला दिलासा
गेल्या तीन दिवसांपासून जळगाव शहरात एकही रुग्ण आढळून येत नसल्याने शहराला दिलासा मिळाला आहे. मंगळवारी भुसावळला दोन, अमळनेर एक, भडगाव एक व चाळीसगाव तालुक्यात सहा रुग्ण आढळून आले.

loading image