esakal | जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे
sakal

बोलून बातमी शोधा

Dam

जळगाव जिल्ह्यात पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव : जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. यामुळे दोन महिन्यांतील पावसाचा ‘अनुशेष’ भरून निघाला आहे. जिल्ह्यात सर्व प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा (Dam Water Increase) निर्माण झाला आहे. वाघूर धरणात ९४ टक्के, हतनूर- ४९, गिरणा- ५४.३५ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटण्याची (Water scarcity) चिन्हे आहेत.

हेही वाचा: ‘करेक्ट कार्यक्रम’चा धाक;धुळ्यातील भाजपचे नगरसेवक सुरक्षितस्थळी


जिल्ह्यात आतापर्यंत विविध कृषी मंडळ स्तरावर १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाणीपातळीत वाढ झाली असून, तीन मोठ्या, तसेच मध्यम, लघु प्रकल्पात सद्यःस्थितीत ६३ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर- ४९.०२, गिरणा- ५४.३५, तर वाघूर- ९३.९९ टक्के, तर अन्य आठ प्रकल्प ओसंडले आहेत. मोठ्या धरणांसह मध्यम, लघु प्रकल्पांत सरासरी ६२.८७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

हेही वाचा: आईच्या चारित्र्यावर बापाचा संशय..पित्याचा दोघा मुलांकडून खून


पावसाळ्याच्या सुरवातीपासून जिल्ह्यात सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने तीन ते चार लघु प्रकल्प वगळता बहुतांश प्रकल्पात निम्म्यापेक्षा कमी उपयुक्त जलसाठा होता. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात चाळीसगाव, तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जामनेर आदी तालुक्यांत झालेल्या ढगफुटी व चक्रीवादळामुळे शेतपिकांसह पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात पाण्याची आवक होत असून, पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे.

हेही वाचा: जळगावकर सावधान..चार दिवसांत वाढले कोरोनाचे दहा रुग्ण

मध्यम प्रकल्पाची स्थिती अशी :
गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाच मिलिमीटर पावसाच्या नोंदीसह १२.८० दलघमी पाण्याची आवक झाली असून, प्रकल्पात ५४.३५ टक्के, हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात १७ मिलिमीटर पावसासह १६०.४७ दलघमी आवक असून, प्रकल्पात ४९.०२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. प्रकल्पात होत असलेल्या आवकमुळे प्रकल्पाचे चार गेट पूर्ण उघडून २७ हजार ७१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जात आहे. मध्यम प्रकल्पांपैकी अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, बोरी व मन्याड प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले असून, बोरी प्रकल्पाचे तीन गेट उघडून एक हजार ४०३, तसेच मन्याड मधून दोन हजार २९५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. वाघूर प्रकल्पात ९३ टक्के, बहुळा- ९५.०९, मोर- ७९.६२, अंजनी- ६५.६०, गूळ- ४२.७१, भोकरबारी-१६.५७ टक्के असा उपयुक्त जलसाठा असून, जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पात सरासरी ६२.८७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी ८८.०७ टक्के जलसाठा असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.


loading image
go to top