esakal | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण; बाजारपेठेत होतेय गर्दी!
sakal

बोलून बातमी शोधा

Fule Market crowd

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण; बाजारपेठेत होतेय गर्दी!

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव : कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर अद्याप बाजारपेठ(Market), व्यापारी संकुलांसाठी निर्बंध कायम असून वेळेची मर्यादा घालून दिल्याने ठराविक वेळेत बाजारात प्रचंड गर्दी (Market crowd) होत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळतेय. दुपारी ४ वाजेपर्यंतची मर्यादा व शनिवार, रविवारी वीकेंड लॉकडाऊनमुळे (Weekend lockdown) नोकरदार वर्गाला दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी कधी करायची? अशी मोठी समस्या भेडसावतेय. तर गर्दी होत असल्याने कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला (Corona third wave) जळगावकर जणू निमंत्रण देत असल्याचे चित्र दररोज दिसत आहे. (jalgaon city market area crowd corona third wave invitation)

हेही वाचा: राष्ट्रवादीच्या बैठकीत गटबाजीवर चालले मंथन

फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली. मार्च, एप्रिलमध्ये या लाटेने तीव्र स्वरुप प्राप्त केल्यामुळे मार्च महिन्यापासूनच लॉकडाऊन व कठोर निर्बंध लादण्यात आले. मेपासून लाट ओसरु लागली आणि आता जून, जुलैत तर संसर्ग नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. असे असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका बघता निर्बंध कायम आहेत.

crowd

crowd

वेळेच्या मर्यादेची अडचण
सध्या पूर्ण लॉकडाऊन नसले तरी शासनाने काही निर्बंध घालून दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात बाजारपेठ, व्यापारी संकुले, दुकानांसाठी दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची मर्यादा घालून दिली आहे. सकाळी साधारणत: ९ ते १० वाजेदरम्यान दुकाने सुरु होतात. मात्र, सकाळी ग्राहक बाहेर पडत नाहीत.

हेही वाचा: कोरोनाचा आलेख झुकतोय नीचांकी पातळीकडे

ठराविक वेळेत गर्दी
खरेदीसाठी खरी गर्दी होते ती साडेदहा- अकरा वाजेनंतर. एकाचवेळी बरेच ग्राहक बाहेर पडत असल्याने साडेदहा ते साडेबारा वाजेपर्यंत बाजारात, रस्त्यांवर मोठी गर्दी उसळते. हीच स्थिती दुकाने बंद होण्याच्या आधी अडीच ते चार वाजेदरम्यान दिसून येते.

सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
ठराविक वेळेत बाजारपेठेत, रस्त्यांवर गर्दी होत असते. गोलाणी मार्केट, फुले मार्केटसारख्या व्यापारी संकुलांमध्ये, सुभाषचौक परिसर, पोलनपेठ या बाजारपेठेच्या रस्त्यांवर या ठराविक वेळेत होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनासंबंधी कोणतेही नियम पाळले जात नाही, असेही चित्र असते. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचा अनुभव रोज येत आहे.

नोकरदारांची अडचण
शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये नोकरीस असलेल्या नोकरदारांची यामुळे मोठी अडचण होते. एकतर कार्यालयीन वेळ साधारणपणे ९ अथवा १० ते ६ अशी असते. नोकरदार सकाळी ९ वाजताच कार्यालयासाठी निघतात. ते ६ वाजताच बाहेर पडतात. त्यामुळे किराणा व अन्य जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी त्यांना वेळच मिळत नाही. शनिवारी, रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने सर्वच दुकाने बंद असतात. त्यामुळे या दिवशीही खरेदी करता येत नाही. त्यामुळे नोकरदार वर्गापुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

हेही वाचा: जळगावात तहसीलदाराला धक्काबुक्की करत चालकाला बेदम मारहाण

असे निर्बंध, अशा अडचणी
- दुकानांची वेळ : दुपारी ४ वाजेपर्यंत
- शनिवारी, रविवारी वीकेंड लॉकडाऊन
- सायंकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी
- केवळ मेडिकलसाठी फिरण्यास परवानगी
त्यामुळे..
- ठराविक वेळेत बाजारात गर्दी
- साडेदहा ते बारा, अडीच ते चार वाजेदरम्यान रस्ते फुल्ल
- या वेळेतच वाहनांची कोंडी
- नोकरदार वर्गाने कधी खरेदी करावी हा प्रश्‍न

loading image