esakal | जळगाव जिल्ह्यात तीन दिवस विजांचा गडगडाटासह पाऊस 
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain

जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आयएमडी'ने दिला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात "अलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. 
- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती 

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस विजांचा गडगडाटासह पाऊस 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात खानदेशात आज, उद्या (ता.3), 4 व 5 जूनला विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने (आय.एम.डी) वर्तविला आहे. 

केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर कोकण, मुंबईत आता "निसर्ग' या चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्‍यता आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ तयार झालेल्या हवेचा कमी दाबाचा पट्या चक्रीवादळात होण्याची चिन्हे आहेत. यामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई, दक्षिण गुजरातला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची चिन्हे आहे. याचा परिणाम खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत होणार असून आगामी तिन दिवस जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाटात पाऊस होणार आहे. अनेक ठिकाणी वीज पडण्याची शक्‍यता आहे. असा अंदाज आय.एम.डी.ने वर्तविला आहे. त्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सतर्कतेचा जिल्ह्यातील यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी शेतात काम न करता घरीच थांबावे असे आवाहनही करण्यात आले आहे. 

जळगाव जिल्ह्यात काल मध्यरात्री नंतर आज अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, झाडांच्या फांदा तुटल्याने जिल्ह्याचा वीज पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी एक तासाने तर काही ठिकाणी तब्बल सहा तासांनी वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे. रात्री पडलेल्या पावसाने आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे कडक उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

शेतकरी शेतात... 
काल रात्री झालेल्या पावसाने जमीन ओलेचिंब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा लवकर पाऊस सुरू झाल्याने आजपासूनच शेतकऱ्यांनी शेतात जमीन नांगरणीसाठी धाव घेतली आहे. अनेक शेतात आज नांगरणी करताना शेतकरी दिसले. तर काही ठिकाणी शेतातील धस, काड्या एकत्रित करून ते जाळताना अनेक शेतकरी दिसून आले.