जळगाव जिल्ह्यात ७० टक्के लसीकरण

दिव्यांनी लसीकरण केंद्रावर येऊन लस घेतली आहे. दिव्यांग आल्याबरोबर त्यांना लसीकरण केले जाते.
Covid Vaccination
Covid Vaccination
Updated on

जळगाव ः जिल्ह्यात कोविड लसीकरणाने (Covid Vaccination) आता चांगलाच वेग धरला आहे. आतापर्यंत १८ वर्षांवरील ७० टक्के नागरिकांना लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. आतापर्यंत एकूण २२ लाख ३७ हजार ६५५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

Covid Vaccination
गिरणा धरणाने शंभरीची केली 'हॅट्रीक'; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

जळगाव जिल्ह्यात १८ वर्षांवरील ३० लाख नागरिक आहेत. त्यापैकी २२ लाख ३७ हजार जणांना (७० टक्के) लसीकरण झाले. त्यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १६ लाख ९० हजार ५७८, तर दोघे डोस घेणाऱ्यांची संख्या पाच लाख ४७ हजार ७७ आहे. १२ ते १३ टक्के नागरिकांनी दोघे डोस घेतले आहेत.

Covid Vaccination
अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील खरीप हंगाम गेला पाण्यात



मागणी केल्यास घरी लस
आतापर्यंत अनेक दिव्यांनी लसीकरण केंद्रावर येऊन लस घेतली आहे. दिव्यांग आल्याबरोबर त्यांना लसीकरण केले जाते. लसीकरणासाठी त्यांना रांगेत उभे राहू लागू नये, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. लस न घेतलेल्या काही दिव्यांग बांधवांनी मागणी केली, तर घरी येउन लसीकरण करण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी त्यांना घरपोच लसीकरणाचे पत्र द्यावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com