esakal | जळगाव जिल्ह्यात मुद्रांकांचा तुटवडा; कामे खोळंबली !

बोलून बातमी शोधा

stamp
जळगाव जिल्ह्यात मुद्रांकांचा तुटवडा; कामे खोळंबली !
sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा : जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी (stamp dealers) तीन वर्षांचा व्यवसाय कर न भरल्याने परवाना नूतनीकरण (License renewal) होण्यास अडचणी येत आहेत. यामुळे परवाना नूतनीकरण रखडले आहे. शासन म्हणते व्यवसाय करतात तर व्यवसाय कर भरणे गरजेचे आहे. यापूर्वी दर वर्षी परवाना नूतनीकरण होत होते. त्यामुळे मुद्रांक विक्रेते दरवर्षी आपोआप व्यवसाय कर भरणा करीत होते. आता तीन वर्षानंतर परवाना नूतनीकरण प्रक्रिया होत आहे. बहुतेक मुद्रांक विक्रेत्यांनी व्यवसाय करच भरला नसल्याने जवळपास तीन आठवड्यापासून परवाना नूतनीकरण रखडले आहे. तालुक्यातील १३ विक्रेत्यांचे परवाने नूतनीकरण रखडले आहे. यामुळे मुद्रांक विक्रेत्यांना स्टॅम्पच (मुद्रांकच) मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेकांना व्यवहार करण्यात अडचणी येत आहेत. ( jalgaon district shortage stamps license renewal problem stamp dealers)

हेही वाचा: राज्याची राजधानी "ना"पास..सातारा आघाडीवर

मुद्रांक विक्रेत्यांना त्यांचा परवाना नूतनीकरण करावा लागतो. या वेळी शासनाने परवाना नूतनीकरणासाठी अनेक दाखले गोळा करण्यास सांगितले आहे. ही कागदपत्रांची जुळवाजुळव, त्यात कोरोना परिस्थिती यामुळे अडचणी वाढल्या आहेत. तसेच तब्बल तीन वर्षांपासून मुद्रांक विक्रेत्यांनी व्यवसाय करूनही व्यवसाय कर परवाना भरलेला नाही. एका वर्षाचा व्यवसाय कर तीन हजार रुपयांचा जवळपास येतो. मात्र तो कर न भरल्याने मुद्रांक अधिकाऱ्याकडूनच परवाना नूतनीकरण रखडले आहे. वास्तविक हे परवाना नूतनीकरणासाठीची कागदपत्रे ३१ मार्चपर्यंत परवाने दुय्यम निबंधक कार्यालयात जमा करावे लागतात व लागलीच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परवाना नूतनीकरण होऊन व्यवहार सुरळीत होतात. मात्र, यावेळी परवाना नूतनीकरण करताना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. यात पोलिस ठाण्याचा दाखला, विक्री कर अधिकारी परवानगी, यासह विविध प्रकारची कागदपत्रे शासनाकडे ऑनलाइन दाखल करावी लागणार आहेत. यात कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत कार्यालयातअपूर्ण कर्मचारी संख्येअभावी अडचणी येत आहेत. गतवेळी जिल्हाधिकारी यांनी एक पत्र दिल्यानंतर लागलीच

हेही वाचा: राज्यातील विद्यापीठ कॅम्पसमध्ये ‘तंबाखू, छेडछाडमुक्त’ अभियान

परवाना मिळाला होता. सहसा एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परवाने जिल्हा कार्यालयातून नूतनीकरण होऊन मुद्रांक विक्री सुरू केली जाते. मात्र या वेळी व्यवसाय कराची मोठी अडचण येत असल्याने नूतनीकरण होण्यास अडचणी येत आहेत.

हेही वाचा: महामार्ग चौपदरीकरणाचे कोरोनामुळे यंत्रणा ‘लॉक’, काम ‘डाउन’ !

अडचणींचा सामना

स्टॅम्पअभावी जमीन, शेती, घर देणे-घेणे, जुने कर्ज भरून नवीन कर्ज घेणे, सोनेतारण, बॅंक कर्ज, तारण असे विविध कामांसाठी स्टॅम्प पेपर मुद्रांक म्हणून महत्त्वाचे असतात. चोपडा दुय्यम कार्यालयांतर्गत १३ परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने नूतनीकरण न झाल्याने नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

(jalgaon district shortage stamps license renewal problem stamp dealers)