
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून तालुक्यातील भाजप सोडला तर सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा व्यक्त करून बंदचे आवाहनही सोमवारी (ता. ७) ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात आले.
जळगाव : महाविकास आघाडीतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या भारत बंदला पाठींबा व्यक्त करण्यात आला आहे. जळगाव जिल्हयातही नागरिकांनी बंद पाळावा असे अवाहन आघाडीतील सर्व पक्षातर्फे करण्यात आले आहे.
्अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हामहानगराध्यक्ष अभिषेक पाटील, कॉंग्रेसचे श्याम तायडे, लोकसंघर्ष समितीच्या प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना गुलाबराव वाघ म्हणाले, केंद्रांने नवीन मंजूर केलेले शेती विधेयक रद्द करावे या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत आंदोलन करीत आहेत.केंद्र सरकार मात्र त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्या यासाठी उद्या ‘भारत बंद’चे अवाहन करण्यात आले आहे. या बंदला महाविकास आघाडीतर्फे पाठींबा व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उद्या (ता. ८) जळगाव जिल्ह्यातही बंद पाळण्यात येणार आहे. सर्व व्यवसाय या निमित्त बंद ठेवावे असे अवाहनही करण्यात आले आहे.
जामनेरला दोनपर्यंत बंद
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून तालुक्यातील भाजप सोडला तर सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर पाठिंबा व्यक्त करून बंदचे आवाहनही सोमवारी (ता. ७) ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तसे लेखी प्रसिद्धीपत्रकही जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारचा (ता. ८) बंद हा अत्यावश्यक सेवा वगळून दुपारी दोनपर्यंत कडकडीत पाळण्यात येणार असल्याचे सर्वपक्षीय प्रतिनिधिंनी सांगितले.
अमळनेरला चक्काजाम आंदोलन
केंद्र सरकारकडून दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या अमानुष वागणुकीचा तीव्र निषेध करण्यासाठी व शेतकरी आंदोलनास पाठबळ देण्यासाठी तालुक्यातील युवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला धारेवर धरत चक्काजाम आंदोलन केले.