
कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला असला तरी धोका अद्याप ही कमी झालेला नाही. परंतू सद्या दिवाळी निमित्त बाजारात प्रचंड गर्दी होत असून अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे चित्र दिसत आहे
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असला तरी रोजच्या बाधितांमुळे रुग्णसंख्येत वाढच होत आहे. चार दिवसांनंतर आज पुन्हा जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात ६८ नवे बाधित आढळून आले. ८३ रुग्ण शुक्रवारी बरेही झाले.
वाचा- मध्य रेल्वेद्वारे दिवाळीनिमित्त पाच वन वे विशेष गाड्या ! -
जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग सध्यातरी नियंत्रणात असल्याचे दिसत आहे. मात्र, ऐन सणासुदीत पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका कायम आहे. दररोज मर्यादित संख्येने रुग्णवाढ होतच असल्याने अद्यापही संसर्गाचा धोका टळलेला नाही. शुक्रवारी तीन हजारांपेक्षा अधिक अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ४८९ झाली आहे. दिवसभरात ८३ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांचा आकडाही ५१ हजार ५८७ वर पोचला असून हे प्रमाण ९६. ४१ टक्के आहे.
जळगावात पुन्हा वाढ
जळगाव शहरात पुन्हा रुग्णवाढ झाली. शुक्रवारी शहरात २८ रुग्ण आढळून आले. तर एकाचा मृत्यू झाला. अन्य ठिकाणी आढळलेले रुग्ण असे : जळगाव ग्रामीण १, भुसावळ ९, चोपडा १०, पाचोरा १, भडगाव २, धरणगाव २, यावल १, एरंडोल २, जामनेर २, पारोळा १, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर ५.
नागरिकांचा पून्हा निष्काळजी पणा सुरूच
कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला असला तरी धोका अद्याप ही कमी झालेला नाही. परंतू सद्या दिवाळी निमित्त बाजारात प्रचंड गर्दी होत असून अनेकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे चित्र दिसत आहे. परंतू ही धोक्याची घंटा असून नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षीत अंतर ठेवून काळजी घ्यावी अशे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे केले आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे