इमारतीची लिफ्ट अन्‌ डॉक्‍टरांचे आठ लाख

रईस शेख
Thursday, 26 November 2020

जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर डॉ. निलेश किनगे ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल नावाचे हॉस्पिटल आहे. सन २०१७ मध्ये चार मजली हॉस्पिटलची नवीन इमारत बांधल्याने हॉस्पिटलला लिप्ट बसविण्याचे काम बाकी होते.

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये लिफ्ट बसवून देतो असे सांगून डॉक्टरची आठ लाखात फसवणूक झाली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संबधीता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगावातील राष्ट्रीय महामार्गावर डॉ. निलेश किनगे ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल नावाचे हॉस्पिटल आहे. सन २०१७ मध्ये चार मजली हॉस्पिटलची नवीन इमारत बांधल्याने हॉस्पिटलला लिप्ट बसविण्याचे काम बाकी होते. यासाठी शहरातील कायनेटिक लिफ्ट इंजिनिअरींग नावाच्या कंपनीतील महेंद्र भदाणे याने डॉ. किनगे यांना भेटून लिफ्ट बसविण्याचे कोटेशन दिले. कोटेशन पाहून डॉ. किनगे यांनी हॉस्पिटलला लिफ्ट बसविण्यासाठी होकार दिला. 

दोन टप्प्यात ऑनलाईन रक्‍कम
डॉ. किनगे यांनी लिफ्ट कंपनीच्या नावावर डॉ. किंनगे यांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी ४ लाख आणि ३ ऑगस्ट २०१८ रोजी ४ लाख असे एकुण ८ लाख रूपये ऑनलाईन टाकले. मात्र लिफ्ट अजूनपर्यंत लावलेली नाही. संशयित आरोपीस महेंद्र भदाणे याला वारंवार फोन करून काम पुर्ण करण्यासाठी संपर्क केला; परंतु आज करतो उद्या करतो असे सांगून तो टाळाटाळ करत असल्याने डॉ. किनगे यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. किनगे यांच्या तक्रारीवरुन जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात महेंद्र भदाणे यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पेालिस नाईक दिलीप सोनार करीत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon doctor kinge hospital lift work eight lakh fraud contractor