मार्गाने जाता-जाता करा ताप, कोरोनाची तपासणी 

मार्गाने जाता-जाता करा ताप, कोरोनाची तपासणी 

जळगाव : साधा सर्दी- ताप, खोकला अशी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी जनरल प्रॅक्टिश्‍नरकडे न जाता त्यांचा ताप व ही लक्षणे कोणत्या स्वरूपाची आहेत, याची तपासणी अगदी महामार्गाने जाता-येताही करता येणार आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात त्यासाठी ‘ड्राइव्ह इन फीव्हर क्लिनिक’ ही अनोखी सुविधा २४ तास उपलब्ध झाली असून, त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. 

कोरोना संसर्गाचे जिल्ह्यातील प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, स्थिती गंभीर बनत चालली आहे. अशावेळी सामान्य सर्दी- खोकला, ताप यासाठीही रुग्ण दवाखान्यात जायला, तपासणी करून घ्यायला घाबरत आहेत. खासगी डॉक्टर, जनरल प्रॅक्टिश्‍नरही अशा रुग्णांची तपासणी करण्यास कचरत आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहत असून, कोरोनाचीही हीच लक्षणे असल्याने चाचणी, निदान व रुग्ण दाखल होण्यासही उशीर होत आहे. 

डॉ. पाटील मेडिकलचा उपक्रम 
या पार्श्वभूमीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने अशा रुग्णांना मार्गाने जाता-येताना साध्या लक्षणांवरील निदानाची तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘ड्राइव्ह इन फीव्हर क्लिनिक’ असे या सुविधेचे नाव असून, त्यासाठी महाविद्यालय व रुग्णालयात २४ तास तीन शिफ्टमध्ये एम.डी. डॉक्टर व स्टाफ उपलब्ध आहे. 

अशा आहेत सुविधा 
‘ड्राइव्ह इन फीव्हर क्लिनिक’ या संकल्पनेंतर्गत अशा स्वरूपाची कोणतीही लक्षणे असल्यास त्या रुग्णाने महामार्गावरून ड्राइव्ह करताना केव्हाही रुग्णालयात यायचे, तापावर त्याची क्लिनिकल तपासणी होईल. गरज वाटल्यास एक्स-रे व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करून अहवाल काय येतो, त्यानुसार उपचार केले जातील. अवघ्या अर्ध्या तासात ही प्रक्रिया पूर्ण होऊन अहवाल निगेटिव्ह आल्यास रुग्णाला लगेच पुढच्या कामासाठी जाता येणार आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com