शिवसेनेत प्रत्येकाला न्याय फक्त एकजुटीने कामे करा !

संजय पाटील
Tuesday, 1 December 2020

शेतकरी संघ अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त जागांवर अध्यक्षपदी अरुण पाटील तर उपाध्यक्षपदी सखाराम चौधरी यांची निवड करण्यात आली.

पारोळा : तालुक्यात शिवसेनेकडे असलेल्या संस्थेत नेहमीच सभासदांचे हित जोपासले गेले आहे. संस्थेच्या संचालकांनी देखील लोकांचा विश्वास संपादन करीत न्यायिक भूमिका घेतली आहे. तळागाळातील कार्यकर्ता कसा पुढे जाईल, हीच भूमिका गेल्या ४५ वर्षांच्या राजकारणात घेतली. त्यामुळे आजही जनता आपल्यावर प्रेम करते. प्रत्येकाला पदाच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या साठी संघटना मजबूत व सक्षम करण्यासाठी एकजुटीने मेहनत घेण्याचे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले. 

आवश्य वाचा-  महापालिकेची समिती पोहचली जिल्हा कारागृहात; आणि केली याची पाहणी -

शेतकरी संघ अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त जागांवर पीठासन अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. सिंहले व सहाय्यक सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड बिनविरोध करण्यात आली. या वेळी अध्यक्षपदी अरुण पाटील तर उपाध्यक्षपदी सखाराम चौधरी यांची निवड करण्यात आली. 

या वेळी बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, उपसभापती दगडू पाटील पंचायत समिती सभापती रेखाबाई भिल, उपसभापती अशोक पाटील, सदस्य प्रमोद जाधव, शेळावे सरपंच राजेंद्र पाटील, शेतकरी संघाचे संचालक डॉ. राजेंद्र पाटील, भिकन महाजन, सुधाकर पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक चतुर पाटील, विजय पाटील, मधुकर पाटील, डॉ. पी. के. पाटील, यांच्यासह शेतकरी संघ, बाजार समिती संचालक, पंचायत समिती सदस्यांसह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon everyone in shiv sena has justice and work together