
मेहरुण परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ त्यांना भाचा सिद्धांत बाविस्कर याठिकाणी भेटल्याने त्याच्याशी बोलत असतांना नागसेननगरातील रितेश शिंदे उर्फ चिच्या हा त्यांच्या दुचाकीवर मागे येवून बसला. तेा मामाचा मित्र असल्याचा समज झाल्याने संतोषचा भाचा घराकडे निघून गेला.
जळगाव : काम आटोपून घराकडे निघालेल्या स्थानिक चॅनलचा व्हिडीओग्राफरच्या दुचाकीवर मागे बसून त्याला चाकूचा धाक दाखवित खिश्यातील रोकड, मोबाईल हिसकावून घेत दुचाकी घेवून पळ काढल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कंवरनगर परिसरात घडली. एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरातील रामनगर परिसरातील संतोष दिगंबर ढिवरे स्थानिक चॅनलवर व्हिडीओग्राफर म्हणुन काम करतात. ते कामानिमीत्त बी. जे. मार्केट परिसरात गेले होते. तेथून संतोष ढिवरे घराकडे निघाले होते. मेहरुण परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ त्यांना भाचा सिद्धांत बाविस्कर याठिकाणी भेटल्याने त्याच्याशी बोलत असतांना नागसेननगरातील रितेश शिंदे उर्फ चिच्या हा त्यांच्या दुचाकीवर मागे येवून बसला. तेा मामाचा मित्र असल्याचा समज झाल्याने संतोषचा भाचा घराकडे निघून गेला.
मोबाईल हिसकावला
रितेश शिंदे उर्फ चिच्या हा सराईत गुन्हेगार असून तो संतोष यांच्या गाडीवर बसला आणि तू पत्रकार असून तू भरपुर पैसे कमवतो असे म्हणत मला आत्ताच्या आत्ता ५० हजार रुपये दे नाही तर तुला जीवे ठार मारेल अशी धमकी देत संतोष यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. प्रतिक्रार करण्याचा प्रयत्न केला असता चिच्याने त्याला धारदार चाकू लावून दुचाकी कंवरनगर सिंधी कॉलनीकडे घेवून गेला.
पेालिस चौकी जवळच..
संतोष ढिवरे याने त्याला दुचाकीवर बसवुन कंवरनगरकडे घेवून आला. येथे चिच्याने त्याची मोटारसायकल हिसकावुन, गळ्यातील चांदिची चैन, खिश्यातील साडेतीन हजार रुपये असा ऐवज हिसकावून दुचाकीवर र्ईच्छादेवी चौकाकडे पसार झाला. याप्रकरणी संतोष ढिवरे यांच्या फिर्यादिवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात राकेश शिंदे उर्फ चिन्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.