esakal | दमदार पाऊस आला..आणि दुबार पेरणीचे संकट टळले
sakal

बोलून बातमी शोधा

Farn work

दमदार पाऊस आला..आणि दुबार पेरणीचे संकट टळले

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः जिल्ह्यात पावसाने (Rain)ओढ दिल्याने ७२ टक्कांवर पेरण्या (Sowing)अडकल्या होत्या. गेल्या वीस दिवसांपासून पावसाची ओढ होती. यामुळे उडीद, मूग, सोयाबीनच्या पेरण्यांपैकी ३० ते ४० टक्के पेरण्या वाया गेल्या आहेत. दोन तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने उरलेल्या पेरण्यांना शेतकऱ्यांनी (Farmers) वेग दिला आहे. मान्सूनची (Manson) अडविलेली वाटचाल आता सक्रीय झाली असल्याने आगामी काळात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये तुर्त चिंता मिटली आहे. (farmer crisis of double sowing was averted due to rains)

हेही वाचा: तेलंगणातील महबूबनगर आहे ऐतिहासिक स्थळपावसाच्या ओढीने वाया गेलेल्या उडीद, मुग, सोयाबीन पिकांचे उत्पादन यंदा घटणार आहे. आता पाउस पडूनही याच्या पेरण्या होणार नाहीत. कारण या पिकांचा लागवडीची वेळ निघून गेली आहे. आता कोरडवाहू कपाशीचा पेरा करण्याकडे शेतकऱ्यांचे कल आहे. आता शेतकरी बाजरी, तूर, कोरडवाहू कपाशीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. कोरडवाहू कपाशीत अंतरपीक म्हणून तूर, बाजरी घेता येते. आंतरपीक म्हणून शेतकऱ्यांना ही पिके घ्यावीच लागतील. ३० जुलै ही कोरडवाहू कपाशी लागवडीची वेळ आहे. आतापर्यंत ७० ते ७५ हजार हेक्टरवर बागायती कपाशीच्या पेरण्या झाल्या आहेत. आता कोरडवाहू शेतकरी कपाशीच्या पेरण्या करीत आहे. यामुळे कोरडवाहू कपाशीचे चांगले उत्पादन येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ज्येष्ठ, दिव्यांगाना ‘निअर टू होम’ लस द्या!

पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मान्सूनही आता सक्रीय झाला आहे. यामुळे आता खरिपाच्या उर्वरित पेरण्यांना वेग आला आहे. तीस जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या पेरण्या पूर्ण होतील. शंभर टक्के पेरण्या होतील.
संभाजी ठाकूर
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत सक्रिय रुग्ण दहाच्या आत

जिल्ह्याचे चित्र (हेक्टरमध्ये)
* पेरणी झालेले क्षेत्र-- ५ लाख ५० हजार ३८
* बागायती कपाशी-- २ लाख ११ हजार १३६
* जिरायत कपाशी -- २ लाख २४ हजार १७५
* ज्वारी--- १५ हजार १७४
* बाजरी-- ३ हजार ५०९
* मका-- ५३ हजार २६३
* तूर, मूग, उडीद-- प्रत्येकी ४४ हजार हेक्टर

loading image