
शेतकरी सन्मान योजनेचे केंद्राकडून पेमेंट मिळेना
जळगाव ः केंद्र शासनाने (Central government) शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजनेंतर्गत (Farmers Honor Scheme) दरमहा पाचशे रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर चार महिन्याने संबंधित शेतकऱ्यांच्या (Farmers) अकाउंटला दोन हजार रुपये जमा होतात. केंद्र शासन नववा हप्ता जमा केल्याचे सांगते. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली असता, केवळ आठव्या हप्ताचे पेमेंट अदा केल्याचे पोर्टलवर दिसून येते. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी सन्मान योजनेचे पेमेंट मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
हेही वाचा: बीएचआर घोटाळा: सुनील झंवरच्या कोठडीसाठी १० मुद्यांचा आधार
जळगाव जिल्ह्यात या योजनेचा पहिला हप्ता चार लाख ४९ हजार ८५५ जणांना मिळाला होता. यात चार महिन्यांचे दोन हजार रुपयांप्रमाणे निधी वरील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. दुसऱ्या हप्त्यात चार लाख ९६ हजार ८३५ शेतकरी, तिसरा हप्ता चार लाख ८४ हजार २९६ शेतकरी, चौथा हप्ता चार लाख ४७ हजार ३८२, पाचवा- चार लाख २५ हजार ३६६, सहावा- तीन लाख ६६ हजार ६६ शेतकऱ्यांना, सातवा हप्ता तीन लाख ५१ हजार ८० शेतकऱ्यांना, तर आठवा हप्ता एक लाख ४७ हजार ३८१ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. दर हप्ता देताना कमी- अधिक शेतकऱ्यांना मिळतो. यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
हेही वाचा: खडसेंच्या कन्या चेअरमन असलेल्या बँकेकडून ‘ईडी’ने मागवली माहिती
केंद्र शासन दरमहा पाचशे रुपये देऊन दान दिल्यासारखे करते. दुसरीकडे शेतमाल फुकट लुटतेय. हा निधी न देता भावांतर योजनेसाठी हा निधी राखीव ठेवावा. जेव्हा हमी दर ठरविला जातो, तेव्हा शेतमालाला हमी दर देण्यासाठी हा निधी वापरला तर शेतकऱ्यांना आनंद मिळेल. तो खरा सन्मान आहे.
-एस. बी. पाटील, सदस्य, शेतकरी सुकाणू समिती
Web Title: Marathi News Jalgaon Farmers Not Received Payment Farmer Scheme
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..