esakal | ३२ गावांचा प्रश्न..शेतकरी करणार आमदारांच्या निवासस्थानासमोर उपोषण
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers strike

३२ गावांचा प्रश्न..शेतकरी करणार आमदारांच्या निवासस्थानासमोर उपोषण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमसरे : मारवड मंडळासह वंचित शेतकरी आमदार अनिल पाटील (MLA Anil Patil) यांच्या निवासस्थानासमोर साखळी उपोषण (Farmers strike) करणार असल्याचे निवेदन नुकतेच तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले आहे.

हेही वाचा: हमीभावात वाढ, खरेदी केंद्रांचे काय?

जुलै, सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत मारवड मंडळासह तालुक्यातील ५२ गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता होता. बाधीत २० गावांना सानुग्रह प्राप्त झाला. मात्र, अजूनही उर्वरित ३२ गावे यापासून वंचित आहेत. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे, त्यानुसार १५ ते १७ सप्टेंबर रोजी तीन दिवस वंचित शेतकरी सकाळी ११ ते १२ या दरम्यान साखळी उपोषण करतील. २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत मारवड मंडळासह तालुक्यातील ५२ गावातील शेती पिकांना जबर फटका बसला होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा व अनेक अडचणींचा सामना करत हेक्टरी २० हजार ४०० रुपये सानुग्रह मंजूर करण्यात यश मिळाले.
त्यानंतर जुलैमध्ये बाधीत २० गावांना सानुग्रह प्राप्त झाला.

हेही वाचा: साथरोगांचे थैमान..मनपाची कुंभकर्णी झोप; भाजपचे आंदोलन

पाठपुरावा करून ही विलंब..

मात्र अजूनही उर्वरित ३२ गावे वंचित आहेत. याबाबत प्रांताधिकारी, आमदार, मंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात आधीच्या निधीच्या उपयोगिता प्रमाणपत्राला जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयुक्त कार्यालयाकडे उशिराने म्हणजे २६ मे रोजी पाठविण्यात आल्याने विलंब झाला. आयुक्त कार्यालयाने जूनमध्ये मंत्रालयाकडे याबाबतचा अहवाल पाठवला. त्यानंतर हे प्रकरण अर्थविभागाकडे प्रलंबित आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात लसीकरणाची ‘लक्षाधीश’ मजल

तर..साखळी उपोषण

या पाश्वभूमीवर मारवड मंडळासह वंचित शेतकरी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानासमोर साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद आहे. निवेदन देतेवेळी शेतकरी श्यामकांत पाटील, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, मधुकर पाटील, शरद साळुंखे, ज्ञानेश्वर पाटील, अमोल पाटील, बाबा सुर्वे, भगवान पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

loading image
go to top