esakal | प्रत्येक गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न करू !
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्येक गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न करू !

कोरोनामुक्त झालेल्यांपैकी प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करुन कोरोना विषाणूमुळे संकटात सापडलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी यावे.

प्रत्येक गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न करू !

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : कोरोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्याकरीता जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले जात आहे. तसेच तसेच आवश्यकता भासल्यास बाधित रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध करुन देवू. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गाव आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी राज्य शासनाच्या विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नागरिकांनीही जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरीकांना केले.
            
भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, महापालिका आयुक्त सतीष कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उप वनसंरक्षक वि. वि. होशिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी, उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, राजेंद्र वाघ, प्रसाद मते, किरण सावंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, नायब तहसीलदार रवी मोरे यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, कोरोनायोध्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय ‍विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            
पालकमंत्री पाटील म्हणाले की, कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या पाठिशी शासन भक्कमपणे उभे आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असले तरी मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनामुक्त होत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांपैकी प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करुन कोरोना विषाणूमुळे संकटात सापडलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी यावे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आणि कोरोना विषाणूच्या रुग्णांवर औषधोपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, खासगी रुग्णालयांसह इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांसह हजारो कोरोना योध्दे अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांचे कौतूक करुन पालकमंत्री म्हणाले, आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका व नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढत आहे. 

यंदाचा स्वातंत्र्य दिन समारंभ साध्या पध्दतीने साजरा करण्याचे शासनाने निश्चित केल्याने जिल्ह्यातील विष्णू भादू खडके, शजगन्नाथ अखर्डू चौधरी, मुरलीधर इच्छाराम चौधरी, वासुदेव नामदेव महाजन, महादू तंगू वाणी या निवडक स्वातंत्र्य सैनिकांना तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पातोंडे, डॉ. संजय पाटील, डॉ. श्रीमती अश्विनी विसावे, डॉ. राहूल निंबाळकर, श्रीमती मारिया आरोळे, धनराज सपकाळे, श्री. अक्षय गोयर,  अभिमान प्रल्हाद सुरवाडे, विवेक रमेश सैदाणे, श्री. सुरेश सोनवणे या कोरोना योध्दाबरोबरच साखरा धनजी मराठे (विरमाता), निर्मला सुवालाल हनुवते (विरपत्नी), इंदुबाई पुंडलिक पाटील (विरमाता), कल्पना विलास पवार (विरपत्नी), सरला बेडीस्कर (विरपत्नी), लक्ष्मीबाई भिवसन पाटील (विरमाता), अनुसयाबाई काशिनाथ शिंदे (विरमाता), तुळसाबाई रोहिदास बागुल (विरमाता), सुनंदा वसंत उबाळे (विरपत्नी), सुरेखा पोपट पाटील (विरपत्नी), कविता राजू साळवे (विरपत्नी), चंद्रकला आनंदा जाधव (विरमाता), कल्पना देवीदास पाटील (विरपत्नी), सुनंदा मनोहर पाटील (विरमाता), रंजना अविनाश पाटील (विरपत्नी),शैला अनंतराव साळूंखे (विरमाता),  रमेश देवराम पवार (विरपिता) या विरमाता, पिता व पत्नी हे कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांसह उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.
            
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जळगाव पोलीस दलाच्या पथकाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तर बॅण्ड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली.

संपादन-भूषण श्रीखंडे
 

loading image