गिरणापात्रातील पुराचे पाणी कालव्यांमध्ये सोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girna River

गिरणापात्रातील पुराचे पाणी कालव्यांमध्ये सोडले

जळगाव : सध्या कमी पाऊस असल्याने सरपंचांसह शेतकऱ्यांनी (Farmers) केलेल्या मागणीची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) यांनी निर्देश दिल्यानंतर गिरणा नदीपात्रातून (Girna River) पुराचे वाहून जाणारे पाणी दहीगाव आणि जामदा बंधाऱ्यातील कालव्यांच्या माध्यमातून सोडले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, नागरिकांनी मंत्री पाटील यांचे आभार मानले.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने गिरणा धरणात (Girna Dam) चांगला पाणीसाठा होता.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात कोरोना चाचण्यांत पुन्हा वाढ; चार नवे रुग्ण आढळले

यंदा ऑगस्ट महिना संपत आला, तरी गिरणा धरणात फक्त ४५ टक्के जलसाठा आहे. दरम्यान, धरणाच्या खालील भागातील बंधाऱ्यांमधून पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पात्रात पुराच्या स्वरूपात वाहून जाते. यामुळे हे पाणी जामदा आणि दहीगाव बंधाऱ्यांना लागून असणाऱ्या कालव्यांच्या माध्यमातून परिसरात सोडण्यात येते. यंदा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिक चिंतित झाले आहेत. यामुळे विविध गावांचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पालकमंत्री पाटील यांना गिरणा बंधाऱ्यांच्या कालव्यांमधून पाणी सोडण्यासाठी साकडे घातले होते. त्यांनी याची तातडीने दखल घेऊन गिरणा विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांना याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या अनुषंगाने जामदा आणि दहीगाव बंधाऱ्यांमधून कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आले.

हेही वाचा: सात मोटारसायकलींसह ‘मृत’ चोरटा अटक..दोन वर्षांपासून फरार

जामदा बंधाऱ्यातील पाण्यामुळे बहाळ, कोळगाव, भडगाव व आमडदेसह परिसराला, तर दहीगाव बंधाऱ्यातून पाणी सोडल्यामुळे जळगाव, एरंडोल, धरणगाव आणि अमळनेर तालुक्यातील गावांना लाभ होणार आहे. यात प्रामुख्याने दापोरा, खेडी, रिंगणगाव, कढोली, वैजनाथ, टाकरखेडा, पाळधी, पथराड, फुलपाट, झुरखेडा, दोनगाव, चांदसर, पिंपळगाव, वराड, हिंगोणा, पिंप्री, अमळनेर तालुक्यांतील पातोंडा, जळोद, कलालीसह इतर गावांना लाभ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळावे, यासाठी रुसलेल्या वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी साकडे घातले जात होते. सोडलेल्या पाण्यामुळे छोट्या नाल्या-ओढ्यात पाणी वाहून विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी वाढेल. धरणगाव, एरंडोल, अमळनेर तालुक्यातील ७० ते ८० गावांना फायदा होईल.

Web Title: Marathi News Jalgaon Flood Water Girna Dam Was Released Into The Canal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :jalgaon newsgirna river