सात मोटारसायकलींसह ‘मृत’ चोरटा अटक..दोन वर्षांपासून फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrest

सात मोटारसायकलींसह ‘मृत’ चोरटा अटक..दोन वर्षांपासून फरार

जळगाव ः मृत्यू झाल्याचे भासवून कुटुंबीयांसह दोन वर्षांपासून फरारी असलेल्या चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराची गुप्त माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेने त्याला अटक केली असून, त्याच्याकडून सात मोटारसायकली जप्त केल्या.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात कोरोना चाचण्यांत पुन्हा वाढ; चार नवे रुग्ण आढळले


दोन वर्षांपूर्वी अट्टल घरफोड्या, चोरटा म्हणून रेकॉर्डवर असलेला मुकुंदा डिगंबर सुरवाडे (वय ३६, रा. विवेकानंदनगर, भुसावळ) मरण पावल्याची नातेवाईक, परिचितांमध्ये अफवा पसरवून त्याचे कुटुंबीयही गायब झाले होते. निंभोरा येथे आणि भुसावळ तालुक्यात ठराविक ठिकाणी मुकुंदाला दिसल्याने त्याने पसरवलेली अफवाच त्याच्या मुळाशी आली. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकातील अशोक महाजन, महेश महाजन, ललिता सोनवणे, किशोर राठोड, श्रीकृष्ण देशमुख, अविनाश देवरे, रणजित जाधव, विनोद पाटील, हरी परदेशी यांच्या पथकाने सलग तीन दिवस पाळत ठेवून मुकुंदाच्या मुसक्या आवळल्या. पथकाला उडवाउडवीची उत्तरे देत स्वतः मुकुंदा नसल्याबाबत ठामपणे सांगत असल्याने पोलिसांनी खात्री केल्यानंतर त्याने आपणच मुकुंदा असल्याचे कबूल केले. चोरीच्या गुन्ह्यांबाबत त्याने जळगाव शहरासह कासोदा, भुसावळ बाजारपेठ, एमआयडीसी यांसह ११ मोटारसायकलींच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: अंजनी प्रकल्पातील जलसाठा सिंचनासाठी उपलब्ध व्हावा-आमदार पाटील


दवाखान्याचे नाव करून
मुकुंदा मोटारसायकल चोरी केल्यानंतर अनोळखी मेकॅनिक, अल्पवयीन मुलांना हाताशी धरून आई आजारी, कधी बाप आजारी, मुलाला दवाखान्यात दाखल केले आहे, अर्जंट १५ हजार रुपये पाहिजेत, असे सांगत वाहने विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निरीक्षक बकाले यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Marathi News Jalgaon Police Arrested The Thief Two Years Later

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :jalgaon newsthief