जळगाव विमानतळावर 'फ्लाईंग ट्रेनिंग'ची सुविधा; राज्‍यातील एकमेव

देविदास वाणी
Sunday, 11 October 2020

पायलट ट्रेनिंग देणाऱ्या दोनच संस्था देशात असून त्यात रायबरेली येथे सर्वात आधी फ्लाईंग ट्रेनिंग देणारे "इग्रो" देशातील पहिले फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर सुरू केले होते.

जळगाव : येथील विमानतळाची 'न्यू फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंटर'साठी निवड झाल्याने जळगाव विमानतळ जगाच्या नकाशावर आले आहे. 

आज पंतप्रधान कार्यालय व भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्या कार्यालयातून प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रात देशात नव्याने सुरू करण्यात असलेले सहा न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पैकी एक प्रक्षिक्षण संस्था जळगाव विमानतळावर सुरू करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे. पायलट ट्रेनिंग देणाऱ्या दोनच संस्था देशात असून त्यात रायबरेली येथे सर्वात आधी फ्लाईंग ट्रेनिंग देणारे "इग्रो" देशातील पहिले फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर सुरू केले होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात गोंदिया येथे अशा प्रकारचे फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर 2008 मध्ये सुरू करण्यात आले होते. 

नाईट लँडिंग सुविधेसह परिपूर्ण
जळगाव विमानतळावरून केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टॅण्डिंग कमिटी सदस्य तथा खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून नाईट लँडिंग सुविधा साकरण्यासाठी मोठा निधी प्राप्त झाला होता. गेल्या वर्षभरात विमानतळाच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी 50 कोटि करण्यात आले आहे. या विमानतळावर सध्याचे स्थितीत अहमदाबाद, मुंबई या विमान फेऱ्या सुरू आहेत.

सहा नवीन उड्डाण प्रशिक्षण संस्था
देशात बेलगावी, खजुराहो ,कलबुर्गी, लीलाबरी, सालेम या पाच विमानतळासोबत सहावे जळगाव विमानतळ नवीन फ्लाईट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. 

जळगाव विमानतळाचा समावेश करण्यात आल्याने लवकरच येथून नवीन पायलट देशसेवेसाठी बाहेर पडणार आहे. जळगाव विमानतळ नैशनल न्यू फ्लाइंग ट्रेनिंगचे नवे जंक्शन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नागरी उड्डयन मंत्री हरिदिप सिह पुरी, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण चेअरमन अरविंद सिंग यांचे मनापासून आभार.
- उन्मेश पाटील, खासदार, जळगाव

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon flying training facility at jalgaon airport