esakal | नो टेंशन..म्युकरमायकोसिस आजारावर होणार मोफत उपचार !
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

नो टेंशन..म्युकरमायकोसिस आजारावर होणार मोफत उपचार !

sakal_logo
By
देविदास वाणी
जळगाव ः महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत ९९६ प्रकारच्या पध्दतीवर उपचार केले जातात. शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवून आता पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसोबत मर्यादित कालावधीसाठी पांढरे रेशन कार्डधारकांसाठी ही योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात कोविड (Covid-19) आजाराच्या ४ हजार १९ रुग्णांवर तर २० हजार २९ नॉनकोविड रुग्णांवर (Noncovid patient) उपचार केले आहेत. अशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे (State Health Guarantee Society) जिल्हा समन्वयक डॉ. गोपाल जोशी यांनी दिली. (free treatment for mucormycosis patient)

हेही वाचा: हॉटस्पॉट ठरलेले स्मार्ट व्हिलेज..झाले कोरोनामुक्त !


सद्यस्थितीत कोविड साथरोग परिस्थितीमध्ये कोविड च्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून येत आहेत. म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचाराकरिता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्जिकल पॅकेजेस ११ व मेडिकल पॅकेजेस ८ मध्ये उपचाराची मुभा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत प्रति कुटुंब, प्रति वर्षी दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण आहे. म्युकरमायकोसिस या आजारासाठी विमा संरक्षणापेक्षा अधिकचा खर्च आल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर अधिकचा खर्च भागविण्यात येणार आहे.

हेही वाचा: सहा गावांसाठी हतनूरचे आवर्तन सुटणार

रेशन, आधार कार्ड असणे महत्वाचे

म्युकरमायकोसिस या आजारातील उपचारामध्ये अँटीफंगल औषधे हा महत्वाचा भाग आहे. संबधित औषधे कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. ही औषधे महागडी आहेत. जळगाव जिल्ह्यात ही औषधे (अॅफोटेरीसीन बी) शासनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अंगीकृत रुग्णालयात पात्र लाभार्थीस शासनाकडून मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचारासाठी लागणारी बहुआयामी विशेष सेवा, या योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपलब्ध आहेत. या योजनेतंर्गत उपचार घेण्यासाठी रुग्णाचे रेशन कार्ड व आधार कार्ड रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या आरोग्य मित्राकडे देणे आवश्यक आहे. या योजने अंतर्गत म्युकरमायकोसिसवर उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येतो.

(free treatment for mucormycosis patient )