दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा डोक्यात फरशी टाकून केला खून !

दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा डोक्यात फरशी टाकून केला खून !
Updated on

जळगाव ः दारू घ्यायला दुचाकी दिली नाही म्हणून मित्राने डोक्यात फरशी टाकून खून केल्याची घटना काल रात्री शिवाजीनगरातील इंद्रप्रस्थ नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस रात्री उशीरा अटक केली. 

पोलिसांनी सांगितले, की अरूण हरी पवार (वय-४५, रा. के.सी. पार्क कानळदा रोड, कानळदा जकात नाक्यामागे शिवाजीनगर) हे दुचाकीवरून घरोघरी जावून साडी विक्री करण्याचे काम करतात. त्यांच्या परिसरात अरूण पवार यांचे मित्र हरीचंद्र उर्फ सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल (रा. इंद्रप्रस्थनगर), नवल मधुकर सपकाळे, मंगेश मधूकर जोहरे (रा. राधाकृष्ण नगर) हे राहतात. अरूण पवार हे आपल्या पत्नीला 'तू स्वयंपाक करून ठेव मी बाहेर जावून येतो' असे सांगून काल (ता.५ रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास मित्र नवल सपकाळे यांच्या सोबत दुचाकीने बाहेर गेले. शिवाजी नगरातील बौध्द विहारजवळील चिकनच्या दुकानावर दोघे आले. त्याठिकाणी सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल उभा होता. तिघे मिळून दारू पिण्यासाठी बसले.

दुचाकी न दिल्याचा आला राग

तिघांची दारू पिऊन झाल्या नंतर काल्या उर्फ सचिन हा अजून दारू घेण्यासाठी अरूण पवार यांच्याकडे दुचाकीची चावी मागीतली. अरूण यांनी दुचाकीची चावी न दिल्याने काल्याला राग आला त्यांने शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. व संतापाच्या भरात अरूण पवार यांच्या डोक्यात बाजुला पडलेली फरशी डोक्यात टाकली. यात अरूण हे गंभीर जखमी झाले.

दवाखान्यात नेले आणि पून्हा आणून सोडले

जखमीवस्थेत नवल सपकाळे यांनी गेंदालाल मील परिसरातील खासगी डॉक्टराकडे घेवून गेले व पुन्हा घटनास्थळी आणून सोडले. हा प्रकार घडल्यानंतर पत्नी रत्नाबाई अरूण पवार यांना माहिती पडल्यानंतर नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमीवस्थेत पतीला पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने देवकर जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथे पवार यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी पत्नी रत्नाबाई अरूण पवार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात संशयित आरोपी हरीचंद्र उर्फ सचिन उर्फ काल्या मंगल अटवाल याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरूण निकम तपास करीत आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Marathi News Esakal
www.esakal.com