दहावीत नाशिक विभागात मुलींची सरशी ! विभागाचा निकाल ९३.७३ 

गजानन पाचपोळ
Wednesday, 29 July 2020

यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भुगोलाचा पेपर लांबणीवर लागला अखेर तो होऊ शकला नाही.

जळगाव ः राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने नाशिक विभागीय मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला आहे. नाशिक विभागाचा निकाल ९३.७३ टक्के लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. 

विभागात नाशिकने बाजी मारली असून ९४.९३ टक्‍के निकाल लागला आहे. त्‍या खालोखाल धुळे ९४.५०, जळगाव ९३.५१, नंदुरबार ८८.१४ टक्‍के निकाल लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाने उसळी घेतली आहे. परीक्षेला एक लाख ९७ हजार९७६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्‍यात एक लाख ८५ हजार ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १२ हजार ४१९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. 
यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भुगोलाचा पेपर लांबणीवर लागला अखेर तो होऊ शकला नाही. यंदा अंतर्गत मूल्यमापन, तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला 

दृष्टिक्षेपात निकाल - 
नाशिक….९४.९३ 
धुळे…….९४.५० 
जळगाव...९३.५१ 
नंदुरबार…८८.१४ 
 

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Girls win in 10th Nashik division! The result of the department is 93.73