esakal | BIG BREAKING : सोने दराचा ऐतिहासिक उच्चांक...काय झाले दर पहा 
sakal

बोलून बातमी शोधा

gold

कोरोनामुळे जागतिक बाजारपेठेत मंदी आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही विविध प्रकारचे बदल होत आहेत. सोने-चांदीच्या दरातही मोठ्या प्रमाणात चढ- उतार होत आहे. सुवर्ण बाजारपेठेवर देखील याचा परिणाम होत आहे. तरी देखील आज सोन्याच्या दरांनी 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

BIG BREAKING : सोने दराचा ऐतिहासिक उच्चांक...काय झाले दर पहा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने होत असलेल्या चढ- उतारामुळे सोने-चांदीच्या दरात वारंवार बदल होताना दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात सोने प्रतितोळा 49 हजार 400 रुपयांपर्यंत गेले होते. सराफबाजारात आज सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांकी गाठली असून सोन्याचे दर प्रतितोळा 50 हजार 700 रूपयांवर पोहचले आहेत. आतापर्यंत सोन्याच्या दरात झालेली ही सर्वात मोठी उच्चांकी वाढ आहे. 
कोरोनामुळे जागतिक बाजारपेठेत मंदी आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही विविध प्रकारचे बदल होत आहेत. सोने-चांदीच्या दरातही मोठ्या प्रमाणात चढ- उतार होत आहे. सुवर्ण बाजारपेठेवर देखील याचा परिणाम होत आहे. तरी देखील आज सोन्याच्या दरांनी 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी सराफ बाजार उघडला; त्यावेळी सोन्याचे भाव 49 हजार 200 जीएसटी मिळून 51 हजार 500 तर चांदीचे दर 51 हजार पाचशे रुपये इतके आहेत. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर सराफ बाजारातील उलाढाल ठप्प झाली होती. परंतु, कमोडिटी मार्केटमध्ये उलाढाल सुरू असल्याने सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहचले होते. 

दर आणखी भडकण्याची शक्‍यता 
टाळेबंदीत काही अंशी शिथिलता देण्यात आल्यानंतर सराफ बाजार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी कमोडिटी मार्केटमध्ये असलेले उच्चांकी भाव आता प्रत्यक्ष बाजार सुरू झाल्यानंतरही कायम आहेत. शिवाय, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मागणी वाढली. सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्‍यता आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

खरेदीचाही कल वाढला 
लॉकडाउन सुरू असला तरी लग्नसराई काही प्रमाणात सुरू आहे. यामुळे सोने- चांदी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दुसरीकडे सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने गुंतवणूकदार देखील खरेदीकडे वळले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्थेत असलेली अस्थिरता देखील सोन्याचे भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचा दावा सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

सोन्याकडे कल वाढेलच 
कोरोना महामारीचे संकट, चीन-भारत यूध्द जन्य स्थिती यासह विविध कारणांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याला मागणी वाढली. यामुळे सोने दरात वाढ झाली आहे. सध्या लग्न सराई संपली असली तरी सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित असते, याभावनेतून ग्राहक सोन्याला पसंती देतील.
- सुशिल बाफना, संचालक, रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स