जळगावात प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

भूषण श्रीखंडे
Tuesday, 26 January 2021

जळगाव जिल्ह्यासाठी ध्वजदिन निधी संकलनाचा इष्टांक वेळेच्या आत पूर्ण करण्यात आले आहे.

जळगावः भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.
 

आवश्य वाचा- राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार !
 

यांना सन्मानीत करण्यात आले

जळगाव पोलीस दलातील प्रदिप पंढरीनाथ चांदेलकर, सहाय्यक फौजदार, एरंडोल पोलीस स्टेशन, विठ्ठल पंडील देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल, जिल्हा विशेष शाखा (ATC) जळगाव, अनिल राजाराम इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, सुनिल भाऊराम चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल, वाचक शाखा, पोलीस अधिक्षक कार्यालय, जळगाव यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याने त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. 

 

वेळेच्या आत ध्वज निधीचे संकलन  
जळगाव जिल्ह्यासाठी ध्वजदिन निधी संकलनाचा इष्टांक वेळेच्या आत पूर्ण करण्यात आल्याने संचालक सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून प्राप्त स्मृतीचिन्ह पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना प्रदान करण्यात आले.

वाचा- जळगाव जिल्‍ह्‍यातील शाळांचे असे असणार नियोजन; पाचवी ते आठवीच्या ७३७ शाळा उघडणार 
 

या मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यास जिल्हाधिकारी अभिजीत राउात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, तहसीलदार सुरेश मोरे यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे सुत्रसंचालन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, राजेंद्र वाघ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकारात हुलवळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, तहसीलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon guardian minister flag hoisting program republic day