चाळीत सडला कांदा; उत्पादकांचे नियोजन बिघडले

मागील वर्षी कांद्याला तेवढा भाव नव्हता. व्याजाने पैसे काढून शेतकऱ्यांनी बियाणे आणले होते
Onion
Onion


अडावद (ता. चोपडा) : येथील उन्हाळ कांद्याच्या (Onion) दरात मागील काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. सरासरी पाचशे ते सहाशे रुपयांनी दर कोसळले आहेत. दुसरीकडे भाववाडीच्या अपेक्षेने साठविलेला उन्हाळ कांदा चाळीतच खराब होत असल्याने अडावद आणि परिसरातील शेतकऱ्यांची (Farmers) चिंता वाढली आहे.

Onion
जळगाव : नगरपालिकांमध्ये प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यास वेग


एकीकडे घसरलेले दर व दुसरीकडे चाळीत खराब होत असलेला कांदा या दुहेरी संकटाने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. अनेक शेतकरी त्यामुळे कर्जबाजारी झाले आहेत. गेल्या वर्षी पावसाने कांद्याची रोपे खराब झाली होती. नंतर बियाण्यांचे दर चार, पाचपट झाले होते. धुळे, साक्री, नाशिक, लासलगाव, झोडगे, मोघण, बोरकुंड, सटाणा, निजामपूर, जैताणे भागातून महागडे बियाणे आणावे लागले होते. त्यातही काही बियाण्यांमध्ये फसवणूक झाली होती. त्यातच मागील वर्षी कांद्याला तेवढा भाव नव्हता. व्याजाने पैसे काढून शेतकऱ्यांनी बियाणे आणले होते, पण भाव कोलमडल्यामुळे शेतकऱ्यांचे व्याजसुद्धा निघाले नाही, अशी परिस्थिती झाली.


या वर्षी मात्र उन्हाळ कांदा अडावद आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी चाळीत भाववाढीच्या अपेक्षेने ठेवलेला होता. मात्र, भाव पाहिजे तेवढा मिळाला नाही. त्यातच मात्र कांदा चाळीतच खराब होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी साठविलेला उन्हाळ कांदा भाव वाढेल, या अपेक्षेने चाळीत ठेवलेला होता, पण चाळीतच त्याला कोंब फुटायला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कांद्याला हमीभाव द्यावा, अशी मागणी अडावद आणि परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Onion
कन्नड घाट वाहतुकीस खुला; अवजड वाहनांना बंदी कायम


अलीकडे मजुरी कमालीची वाढली आहे. तसेच खतांचा भाव व फवारणीचे भाव २० ते २५ टक्क्यांनी वाढलेले आहेत. उत्पादन खर्चही भरून निघेनासा झाला आहे. शासनाने कांदा निर्यातीचे धोरण स्वीकारावे किंवा हमीभाव द्यावा तरच शेतकरी टिकेल.
-रूपेश माळी, कांदा उत्पादक शेतकरी, अडावदद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com