esakal | अनर्थ टळला; ठोका चुकविणारी गॅसकंटेनर- ट्रकची धडक 
sakal

बोलून बातमी शोधा

accident

राष्ट्रीय महामार्गावर दुरदर्शन टॉवरजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस कंन्टेनरला सुसाट ट्रकचालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन जोरदार धडक दिली.

अनर्थ टळला; ठोका चुकविणारी गॅसकंटेनर- ट्रकची धडक 

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : जळगाव- भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील दुरदर्शन टॉवरसमोर आयशरसारखी दिसणारी टाटा ट्रक आणि गॅस कंन्टेनरची भरधाव समोरासमोर धडक झाली. सकाळी घडलेल्या या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून गॅस कंटेनरचा चुराडा झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नागपुर येथून मालेगावकडे कापडाचे सुत घेवुन निघालेला, यमूना ईश्वर माळी (रा. धुळे) यांच्या मालकीचा ट्रक (क्रमांक एमएच १८ बीएच ५३५५) आज सकाळी जळगाव शहर हद्दीत शिरला. राष्ट्रीय महामार्गावर दुरदर्शन टॉवरजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस कंन्टेनरला सुसाट ट्रकचालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन जोरदार धडक दिली. यात गँस कंन्टेनरच्या पुढचा भागाचा पुर्णपणे चुराडा होवून गॅसने भरलेले टँकर रोडाच्या बाजूला असलेल्या गड्ड्यात कलंडला. अपघातात गँस कंटेनरचा चालकाने प्रसंगावधान राखत स्वतःचे जीव वाचवले. तर आयशर वरील चालक गोरख गोविंदा पाटील (वय-२५ रा. रतनपूरा बोरकून ता.जि.धुळे) हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातात देान्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले असून अपघाताचे वृत्त कळताच एमआयडीसी पेालिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पेालिस कर्मचारी गणेश शिरसाळे, चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येवुन अपघातग्रस्त वाहने जप्त करण्यात आली आहे. 

थोडक्यात अनर्थ टळला 
धुळेकडे जाणारी टाटा ट्रक आणि गॅसकंटेनर अपघातात कंटेनरचे अक्षरशः सुटेभाग होवून मागील चाके निखळून रस्त्यावर धावत होती, सुमारे पंधरा हजार लिटर लिक्वीड गॅसने परीपुर्ण भरलेला टँकर रस्त्याच्या बाजुला जावून कलंडला, टँकरला जर गळती होवून आग लागली असती तर, एखाद्या शक्तीशाली बॉम्बस्फेाटा सारखे नुकसान होवुन मोठी प्राणहानी घडली असती. सुदैवाने यात गॅसगळती न झाल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसानी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून तत्काळ वाहतुक सुरळीत केली. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image