माझ्यात आणि तुकाराम मुंडेमध्ये आग लागणार नाही; आमचं काम तर पाणी देण्याचं

भूषण श्रीखंडे
Tuesday, 1 September 2020

आमत खातं जनतेला पाणी देण्याच आहे. आग लावण्याचे नव्हे. त्यामुळे अधिकारी तुकाराम मुंढे व माझ्यात आग लागलेच कशी?

जळगाव:  तुकाराम मुंढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव झाले असून पाणीपुरवठा विभागाचे गुलाबराव पाटील हे मंत्री आहे. दोघांची ओळख ही फायरब्रँड म्हणून असून एकाच विभागाचा कारभार त्यांच्याकडे आहे. त्यामुळे दोघात जमणार नाही असे चर्चा सुरू झाली. यावर चर्चा करणाऱयांवर पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी सनसनीत उत्तर देवून उलट अनुभवाचा फायदा घेणार असे मत व्यक्त केले.  

 

शिस्तप्रिय अधिकारी व कठोर निर्णय म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्त पदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील पाटील यांच्या कडे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता खाते आहे. त्याच खात्याचे सचिव म्हणून मुंढेचे नियुक्ती करण्यात आली आहे. 

दोघांकडे पाणी देण्याचे खाते

आमत खातं जनतेला पाणी देण्याच आहे. आग लावण्याचे नव्हे. त्यामुळे अधिकारी तुकाराम मुंढे व माझ्यात आग लागलेच कशी? त्यांच्या अनुभवाचा आपण फायदा करून घेणार आहोत. असे मत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व्यक्त केले. 

 

मुंढेची कारकिर्द वादग्रस्त

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय कारकिर्द ही नेहमी वादग्रस्त असून पंधरा वर्षात त्यांच्या चौदा बदल्या झाल्या आहेत. नागपुर आयुक्तावरून आता जीवन प्राधीकरणात प्रकल्प व व्यवस्थापक सल्लागार म्हणून त्यांची बदली झालेली आहे. याच विभागाचे मंत्री शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आहेत. ते देखील स्वभावानेही फटकळ आणि आक्रमक आहेत. त्यामुळे दोंघामध्ये जोरदार संघर्ष होणार असे बोलले जात आहे. 

 

मुंढेच्या कामाचा अनुभव घेवू

पाणी पुरवठा मंत्री पाटील म्हणतात की मुंढे आमच्यात कोणताही संघर्ष होणार नाही हे मी खात्रीने सांगतो. ते एक चांगले अधिकारी असून अनेक विभागाचा कामांचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आपण फायदा घेवून जनतेला पाणी देण्याच्या योजनांचा चांगल्या रितीने अमलंबजावणीचे काम वेगाने करू असे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon IAS officer Tukaram Mundhe and Water Supply Minister Gulabrao Patil will have a discussion