esakal | पोलिस महानिरीक्षकांना घरफोड्यांची सलामी !
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस महानिरीक्षकांना घरफोड्यांची सलामी !

शिवाजीनगर परिसराला दोन पेालिस ठाण्यांच्या हद्दीचा परिसर असून, या परिसरात सर्वांधिक शिक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे निवास्थाने असून, या परिसरात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे.  

पोलिस महानिरीक्षकांना घरफोड्यांची सलामी !

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव  : पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, वार्षिक इन्स्पेक्शननिमित्ताने जळगाव जिल्‍हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा या वेळी घेतला जाईल. दरम्यान, जिल्ह्यात शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध, घरफोडीचे गुन्हे वाढले असून, इन्स्पेक्शनच्या आदल्याच दिवशी शहर उपविभागात सलग दोन घरफोड्यांचे प्रकार घडले. मास्टर कॉलनीत चोरट्यांनी चार मोबाईलसह रोकड लांबवली. तर, शिवाजीनगर उस्मानिया पार्क येथे थोडक्यात नेम चुकल्याने मोठी घरफोडी होऊ शकली नाही. 

आवश्य वाचा- बीएचआर घोटाळा: राज्यभरातील सात खटल्यांचे कामकाज जळगावात 

शहरातील मास्टर कॉलनीतील जावेद नबी काकर (वय ३२, रा. बरकाती चौक) व त्यांचे कुटुंबीय शनिवारी रात्री दहाला जेवण करून झोपले. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने खिडकीतून हात घालून घराचा दरवाजा उघडला. हॉलमध्ये ठेवलेले १२ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल आणि घरखर्चासाठीचे आठ हजार रुपये लांबविले. पहाटे पाचच्या सुमारास जावेद काकर हे झोपेतून उठल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसला. तसेच, घरात असलेले चारही मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. सोमवारी सायंकाळी उशिरा जावेद काकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे तपास करीत आहेत. 

पेट्रोलपंपचालकाचे घर फोडण्याचा प्रयत्न 
शहरातील शिवाजीनगर विस्तारीत वस्ती उस्मानिया पार्क येथे चोरट्यांनी घरफोडीचा धाडसी प्रयत्न केला. औरंगाबाद रोडवर पेट्रोलपंपचालकाचे अलिमियाँनगर येथील घरी चोरट्यांनी कंपाउंड, नंतर ग्रीलचे गेट तोडले, मात्र मुख्य प्रवेशद्वार बराच प्रयत्न करूनही तोडू न शकल्याने रिकाम्या हाती परतावे लागले. 

वाचा- अतिवृष्टीने बाधित २० गावांना  दिलासा; शेतकऱ्यांसाठी पाच कोटींचे अनुदान -

गस्त वाढविण्याची मागणी 
शिवाजीनगर उड्डाणपुलामुळे शहराच्या या भागाचा संपर्कच तुटला असून, मोठ्या फेऱ्याने जावे लागत असल्याने पोलिस कर्मचारी गस्तीला जाण्यासही टाळा टाळ करतात. तालुका आणि शहर अशा दोन पेालिस ठाण्यांच्या हद्दीचा परिसर असून, या परिसरात सर्वांधिक शिक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे निवास्थाने असून, या परिसरात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image