जळगाव शहर अतिक्रमणाच्या विळख्यात !

भूषण श्रीखंडे
Sunday, 15 November 2020

शहरातील मोठाली अतिक्रमणे आणि व्यापारी संकुलांकडे त्यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष केले जाते. दुकानाबाहेरील फलकापासुन ते थेट टेबल, हातगाडी, गॅरेजची पेटी ठेवण्यापर्यंत हप्ते घेतले जातात.

 जळगाव : शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुलने तसेच बाजारापट्टा, मुख्य रस्ते व नविन वसाहतीला जोडणारे रस्त्यांवर टपऱया, हाॅकर्सचा विळखा पून्हा वाढू लागला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

आवश्य वाचा- प्रकाशापासून दूर असलेल्या झोपड्या युवकांनी दिवा लावून उजाळल्या !
 

 

जळगाव  महानगर पालिका प्रशासकिय इमारतीला लागून असलेल्या गोलाणी व्यापारी संकुलात तळ मजल्यापासून चौथ्या मजल्य- पर्यंत जाण्या-येण्यासाठी विविध विंग्ज्‌चे जिने आहेत. पायी चालणाऱ्यांसाठी फुटपाथ, दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी जागा आणि वाहनांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र येथील उपद्रवी व्यावसायिक व्यापाऱ्यांमुळे प्रचंड त्रास सामान्य नागरीकांना सोसावा लागत आहे.

फुटपाथच्या जागेवर दुकानदारांनी मोठ-मोठे फलक-साईनबोर्ड उभे करुन रस्ता अडवला आहे. जिन्याच्या पोर्च मध्ये काहींनी पान टपऱ्या, नाष्टागाड्या उभ्या करुन जागा अडवली आहे. तर काही व्यापाऱ्यांनी चक्क बांधकामातच फेरबदल करुन जागा बळकावल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहे.

 

बाजारात चालता येईना

जळगाव शहरातील बाजार परिसरातील मुख्य व लहान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विविध विक्रेत्यांनी व्यापले आहे. अतिक्रमण निर्मूलन कारवाई तीन-चार महिन्यापूर्वी राबविण्यात आली. परंतू नंतर कारवाई थंड झाल्यानंतर पून्हा आता बाजारातून साधे चालतांना देखील नागरिकांना मुश्कील झाले आहे. 

आवर्जून वाचा- पुण्यावरून दिवाळीला घरी येत होता, दुदैवी घटनेचा निरोप येताच गावावर पसरली शोककळा -

नविन रस्त्यांवर अतिक्रमण  

शहरातील नविन वसाहतींना जोडणारे रस्त्यांवर आता हळुहळू अतिक्रमण वाढू लागले आहे. दिवसेंदिवस नविन टपऱया, खाद्य पदार्थ विक्रत्यांच्या गाड्या पडू लागल्याने या रस्त्यांवरील वाहतुक तसेच नागरिकांना होणाऱया त्रासाची नविन समस्या निर्माण सुरू झाली आहे. यात गिरणा पंपीग रस्ता, पिंप्राळा, मोहाडी परिसर, निमखेडी रस्ता आदी रस्त्यांवर समस्या अतिक्रमणाची समस्या सुरू झाली आहे.

अतिक्रमण विभागाचे हप्ते ? 
वाहतुकीला आणि रस्ते अडवणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालीका अतिक्रमण विभागाचे भलेमोठे पथक, अधिकाऱ्यांचा ताफा तैनातीला आहे. दिवसभर केवळ भाजी विक्रेते-हॉकर्स यांच्यावर धाकदपटशहा करुन हा विभाग आपला उदनिर्वाह चालवते. मात्र, शहरातील मोठाली अतिक्रमणे आणि व्यापारी संकुलांकडे त्यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष केले जाते. दुकानाबाहेरील फलकापासुन ते थेट टेबल, हातगाडी, गॅरेजची पेटी ठेवण्यापर्यंत हप्ते घेतले जात असल्याचे गोलाणीच्या प्रकरणातून ओरड होवू लागली आहे. 

प्रवेशद्वारच बळकावले 
सतरा मजली शेजारील ई-विंग मध्ये मोबाईल दुकानदाराने चक्क प्रवेशद्वारच खरेदी करुन घेतले आहे. मुख्य दुकानात फेरबदल करुन ओटा पुढे काढला आहेच, मात्र आता टेबल ठेवुन प्रवेशद्वाराचे दुकान केले आहे. खाली हिरवे कालीन टाकून संपुर्ण जागेची मालकीच त्याने मिळवली असून एका दुकानाला एक फलकाचा नियम पायदळी तुडवून प्रायोजीत फलकांनी वापराचे रस्ते अडवल्याची परीस्थीती निर्माण झाली आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Jalgaon city in the grip of encroachment