esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Market Committee

जळगाव जिल्ह्यातील बारा बाजार समितीच्या निवडणूका जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यातील बारा बाजार समितीच्या (Market Committee) निवडणूका (Election) जाहीर झाल्याने इच्छूकांच्या आतापासूनच हालचाली सुरू झाल्या आहेत. गत निवडणूकीत डावलल्या गेल्याने यंदा तरी आपली वर्णी लागावी यासाठी इच्छूकांनी जिल्ह्यातील नेत्यांशी संपर्क सुरू केला आहे.

हेही वाचा: जामनेर; ‘पब्जी’चा बळी..खेळाच्या नादात तरुणीची आत्महत्या

२०१५ ला झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणूकीत काही ठिकाणी भाजप तर काही ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादीची सत्ता आली होती. यंदा राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामुळे जिल्ह्यातील बाराही समित्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणून आणण्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षाचा भर असेल.


असे असले तरी निवडणूक दोन ते अडीच महिन्यांनी होणार आहे. त्यासाठी कोणाला उमेदवारी द्यावयाची, कोण किती प्रबळ आहे याची चाचपणी सर्वच पक्ष करतील. त्या अनुषंगाने बैठकांचे नियोजन सर्वच राजकीय पक्षाने सुरू केले आहे. इच्छूकांनी आपण कोणत्या मतदार संघातून लढवू शकतो, निवडणूकीत किती खर्च करू शकतो, प्रतिस्पर्धी कोण उभा राहू शकेल याचा अंदाज घेणे सुरू केले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र बंद : जळगावात मविआ-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा


प्रत्येक समितीत १८ संचालक
बारा बाजार समित्यांच्या निवडणूकीत प्रत्येकी १८ संचालक निवडून द्यावयाचे आहे. त्यात १५ शेतकरी गटातून, २ संचालक व्यापाऱ्यांमधून तर एक संचालक हमाल मापाडी संघातील असेल.
शेतकरी गटातील ११ संचालक विकासो मधून निवडले जातील. चार संचालक ग्रामपंचायत मतदार संघातून निवडले जातील.

loading image
go to top