जळगाव जिल्ह्यात पाच महिन्यांतील सर्वांत कमी ३० रुग्णांची नोंद

सचिन जोशी
Wednesday, 4 November 2020

रिकव्हरी रेट ९६.३८ टक्क्यांवर पोचला आहे. ॲक्टिव रुग्णांची संख्याही साडे सहाशेपर्यंत खाली आली आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी आज एकही मृत्यू झाला नाही. 

जळगाव : जिल्ह्यात बुधवारचा सलग दुसरा दिवस कोरोना मृत्यूविना गेला. दिवसभरात प्राप्त अहवालात अवघ्या ३० नव्या बाधितांची नोंद झाली. गेल्या पाच महिन्यांत नोंदली गेलेली एका दिवसातील सर्वांत कमी संख्या आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे आजचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त म्हणजे ६३ होती. 

वाचा- झटपट लाॅटरीच्या नावाखाली सुरू होता सट्टापेढ्यांचा धंदा; ते ही पोलिस स्टेशनच्या काही अंतरावर ! 

जळगाव जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आता बऱ्यापैकी नियंत्रणात येत आहे. दीड महिन्यापासून नव्या कोरोना बाधितांची संख्या सातत्याने घटत आहे. कोरोना संसर्गाचा आलेख खाली आला आहे. दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी होत आहे. गेल्या दिवसभरात नवे ३० रुग्णच आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ३५९ झाली आहे. बुधवारी बरे झालेल्यांची संख्या ६३ होती, एकूण बरे झालेले रुग्ण ५१ हजार ४३० झाले आहेत. रिकव्हरी रेट ९६.३८ टक्क्यांवर पोचला आहे. ॲक्टिव रुग्णांची संख्याही साडे सहाशेपर्यंत खाली आली आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी आज एकही मृत्यू झाला नाही. 

 
असे आढळले रुग्ण 
आज जळगाव ग्रामीणसह पाचोरा, जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर, बोदवड या सहा तालुक्यांत एकही रुग्ण सापडला नाही. जळगाव शहर ८, भुसावळ २, अमळनेर २, चोपडा ३, भडगाव १, धरणगाव १, यावल २, रावेर १, पारोळा २, चाळीसगाव ८. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Jalgaon district recorded at least thirty patients in five months