फडणवीसांनी तिकीट वाटपात गोंधळ केल्यामूळेच भाजपची सत्ता गेली- खडसे   

भूषण श्रीखंडे
Thursday, 22 October 2020

मुख्यमंत्री तसेच नेतृत्व स्वःताजवळ असलेल्या फडवीसांनी हम करे सो कायदा समजत तिकीट वाटपात गोंधळ घातला. माझ्या सारख्या सहा-सहा टर्म निवडणून आलेले व हमखास येणाऱया जागांवर अनेकांचे त्यांनी टिकीट त्यांनी कापले.

जळगाव : नाराज एकनाथराव खडसे यांनी हे भाजप सोडणार आणि राष्ट्रवादीत जाणार अनेक दिवसापासून चर्चा होती. मात्र बुधवारी अखेर या चर्चेला विराम देत भाजपाला राम राम ठोकल्याने भाजप पक्षाला मोठा हादरा दिला आहे. त्यात आज पून्हा माध्मयांशी संवाद साधतांना खडसे म्हणाले, की देवेंद्र फडवीसांनी निवडणूकीच्या काळात तिकीट वाटण्याचा जो गोंधळ घातला त्यामुळे भाजप पून्हा सत्तेत येवू शकली नाही अशी फडवीसांवर पुन्हा तोफ डागली. 

आवश्य वाचा- खडसे-फडणवीसांमध्ये अशी पडली वादाची ठिणगी; वाचा एका क्लिकवर

खडसे यांनी बुधवारी भाजप सदस्याचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. फडवीसांनी दिलेल्या त्रासामूळेच मला पक्ष सोडावा लागत असून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले असे गंभीर आरोप खडसेंनी पक्ष सोडतांना केले. यावर त्यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी आज पून्हा माध्यमांशी संवाद साधतांना खडसे म्हणाले, की राजकाणातून संपविण्याचा प्रयत्न फडवीसांनी केला त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय म्हणून घ्यावा लागला. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजप पून्हा सत्तेत येणार अशी परिस्थीती होती. केंद्रात मोदी सरकारचे चांगले काम सोबत शिवसेना देखील होती. परंतू मुख्यमंत्री तसेच नेतृत्व स्वःताजवळ असलेल्या फडवीसांनी हम करे सो कायदा समजत तिकीट वाटपात गोंधळ घातला. माझ्या सारख्या सहा-सहा टर्म निवडणून आलेले व हमखास येणाऱया जागांवर अनेकांचे त्यांनी टिकीट त्यांनी कापले. याच तिकीट वाटपाच्या गोंधळात त्यांनी आपली सत्ता गमावून बसले. या जागा जर आल्या असत्या तर आज भाजपा सत्तेत असती असे मत खडसेंनी यावेळी व्यक्त केले. 

पंकजा मुंडेवर नो कमेन्टस
माध्यम प्रतिनीधींनी पंकजा मुंडे देखील भाजप पक्ष सोडणार का असा प्रश्न विचारला. यावर बोलतांना खडसे म्हणाले, की मला काहीच माहिती नाही, याबाबत मला बोलायचे नाही असे सांगून नो कमेन्टस बोलले.

आवर्जून वाचा- सरपंच ते महसूलमंत्री अशी स्वयंभू खडसेंची वाटचाल !
 

राष्ट्रवादीत का गेले ?
सत्तेत शिवसेना, काँग्रेस असतांना तुम्ही राष्ट्रवादी पक्ष का निवडला असा प्रश्न माध्यमांनी खडसेंना विचारला. यावर खडसे म्हणाले, की भाजपात मला राहयचे नव्हते मी कार्यकर्त्यांशी अनेक वेळा चर्चा केली. मला व कार्यकर्त्यांना वाटले या पक्षात जावे म्हणून हा राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Khadse accused BJP of not regaining power after Fadvis interfered in ticket distribution