
मानवी आरोग्यासाठी लिंबू हे वरदान मानले जात; परंतु सद्य:स्थितीत पडल्याने लिंबू शेतातच पडून सडत असल्याने चित्र बघायला मिळत आहे. तालुक्यात लिंबू पिकाला पोषक वातावरण आहे.
वावडे (ता. अमळनेर) : गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे लिंबाच्या झाडांचे नुकसान होऊन मोठा फटका बसला होता. आता भाव तळाशी गेल्याने तोडणीचा खर्च निघत नसल्याने लिंबू उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
मानवी आरोग्यासाठी लिंबू हे वरदान मानले जात; परंतु सद्य:स्थितीत पडल्याने लिंबू शेतातच पडून सडत असल्याने चित्र बघायला मिळत आहे. तालुक्यात लिंबू पिकाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे दरवर्षी लिंबूचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, जिल्ह्यात पाऊस व अतिवृष्टीमुळे लिंबाचे नुकसान झाले आहे. सध्या ५० ते ६० रुपये प्रतिकट्टे (१५ किलो) भाव मिळत असून, त्यासाठी लागणारा तोडणी व वाहतूक खर्चही शेतकऱ्यांना काढणे होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोडणी करण्यापेक्षा व लिंबू बाजारात विक्रीसाठी नेल्यापेक्षा शेतातच पडू देण्याचे ठरविल्याचे दिसत आहे.
शासनाने मदत करावी
यंदा लिंबाचे भाव तळाशी गेले असून, त्यासाठी येणारा मजुरी खर्च काढणे शेतकऱ्यांना शक्य राहिले नाही. त्यामुळे तालुक्यातील लिंबू उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला असून, शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.